कोरोनामुळे अभिनय कट्टाची "राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा २०२०" होणार ऑनलाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 10:19 AM2020-11-22T10:19:46+5:302020-11-22T10:20:14+5:30
Thane News : अभिनय कट्टयाची हि राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा दरवर्षी १ डिसेंबर रोजी अभिनय कट्टयावर होत असते,ह्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक येत असतात.
ठाणे - अभिनय कट्टा गेली अनेक वर्षे सातत्याने राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा घेत आला आहे. अभिनय कट्टयाची हि राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा दरवर्षी १ डिसेंबर रोजी अभिनय कट्टयावर होत असते,ह्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक येत असतात..आपली कला सादर करतात व अनेक पारितोषिके पटकावतात...यंदा हे कोरोनचं संकट लक्षात घेऊन अभिनय कट्ट्याने ही स्पर्धा ऑनलाईन घेण्याचे ठरवले आहे.
कारण दरवर्षी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची संख्या ही ९०-१०० अशी असते...जरी (०५ नोव्हेंबर) पासून थिएटर सुरू झाले असले तरी स्पर्धकांच्या आरोग्यविषयक काळजीपोटी ही स्पर्धा ऑनलाईन घेण्याचे ठरवण्यात आले आहे जेणेकरून कोणास त्रास होणार नाही... ह्या स्पर्धेसाठी स्पर्धकानी त्यांचे एकपात्री सादरीकरणाचे व्हिडिओ पाठविण्यास सुरुवात केली आहे. व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख ( २७ नोव्हेंबर २०२० ) असेल, व स्पर्धेचा निकाल १ डिसेंबर २०२० रोजी अभिनय कट्टयाच्या फेसबुक पेज वर लागेल... स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही...स्पर्धकांसाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे. एकपात्री स्पर्धेकर्ता दोन वयोगट असतील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी. वयोगट पुढीलप्रमाणे.
१. लहान गट :- ५ ते १४ व
२. मोठा गट:- १५ ते पुढील
सादरीकरणाची भाषा मराठी असावी असे आवाहन आयोजक किरण नाकती यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9987228468 या क्रमांकावर संपर्क साधावा.