कोरोनामुळे यंदा येऊरमध्ये झाली नाही प्राणिगणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 12:04 AM2020-10-04T00:04:10+5:302020-10-04T00:04:18+5:30

लॉकडाऊनचा परिणाम मात्र सकारात्मक; पर्यटक नसल्याने प्राण्यांचा मुक्तसंचार

Due to the corona, no census was taken in Yeoor this year | कोरोनामुळे यंदा येऊरमध्ये झाली नाही प्राणिगणना

कोरोनामुळे यंदा येऊरमध्ये झाली नाही प्राणिगणना

Next

- स्रेहा पावसकर

ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत असणाऱ्या प्राण्यांची दरवर्षी गणना केली जाते. गेल्या काही वर्षांत येऊर हद्दीत असणाºया प्राण्यांची संख्या वाढते आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनचा फटका या प्राणिगणनेलाही बसला आहे. लॉकडाऊनमुळे यावर्षीची प्राणिगणना झाली नाही. परंतु, माणसांचा जराही वावर नसल्याने यंदा उद्यानाच्या येऊर हद्दीत अनेक प्राणी मुक्तवावर करताना दिसत आहेत.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर हद्दीत प्राण्यांची संख्या वाढते आहे. ही प्राण्यांची संख्या दरवर्षी बुद्धपौर्णिमेला गणली जाते. मात्र, यंदा मार्चपासूनच लॉकडाऊन सुरू झाले. परिणामी, बुद्धपौर्णिमेला होणारी प्राणिगणना यंदा होऊ शकली नाही. मात्र, गेल्या वर्षीच्या प्राणिगणनेनुसार आणि अंदाजानुसार येथे सुमारे ४२ बिबटे, २०० सांबर, ४०० च्या आसपास हरिणे, याशिवाय डुकरे, रानमांजरे, माकडे, वानरे असे विविध प्राणी पाहायला मिळतात. भक्ष्याच्या शोधात बिबट्यावगळता अन्य प्राणी फारसे उद्यानाबाहेर मानवी वस्तीत येत नाहीत. उलट, हे प्राणी पाहण्यासाठी, त्यांची छायाचित्रे टिपण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक, प्राणिप्रेमी येऊर येथील टुरिस्ट पॉइंटवर जातात. मात्र, यंदा उद्यानात प्रवेश पूर्णपणे बंद आहे.

पुढल्या वर्षी होणार
गेल्या काही महिन्यांत टुरिस्ट पॉइंटवर पर्यटक नसतात. याचा सकारात्मक परिणाम प्राणिजीवनावर पाहायला मिळतो आहे. माणसांची गर्दी नसल्याने अनेक प्राणी मुक्तपणे संचार करताना दिसतात. अगदी टुरिस्ट पॉइंटपर्यंत ते येतात.
- राजेंद्र पवार, परिक्षेत्र वनाधिकारी, येऊर

गेल्या काही वर्षांत येथील प्राण्यांची संख्या वाढते आहे. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे प्राणिगणना करता आलेली नाही. परंतु, पुढील वर्षी ती नक्की होईल.
- विकास कदम, परिमंडळ वनाधिकारी, येऊर

Web Title: Due to the corona, no census was taken in Yeoor this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.