पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्याने डबे झाले वेगळे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 05:34 AM2019-03-08T05:34:39+5:302019-03-08T05:34:44+5:30

कपलिंग तुटल्यामुळे मनमाड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंचवटी एक्स्प्रेसच्या इंजिनासह दोन डबे पुढे गेले,

Due to the coupling of Panchavati Express, | पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्याने डबे झाले वेगळे

पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्याने डबे झाले वेगळे

Next

डोंबिवली : कपलिंग तुटल्यामुळे मनमाड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंचवटी एक्स्प्रेसच्या इंजिनासह दोन डबे पुढे गेले, तर उर्वरित २२ डबे मागे राहिल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी १०.१५ च्या दरम्यान कल्याण येथे पत्रीपुलानजीक घडला.
अनेकांनी तातडीने डब्यांमधून उतरून नेमके काय घडले, याची माहिती घेतली. कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजताच त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. अनेक प्रवाशांनी पायपीट करत कल्याण स्थानक गाठले व तेथून ते लोकलने मुंबईला रवाना झाले.
सकाळच्या वेळेत ही घटना घडल्याने रेल्वे प्रशासनाने मुंबईकडे जाणारी आणि तेथून कल्याणच्या दिशेने येणारी जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावरून वळवली. त्यामुळे काही काळ कल्याण- डोंबिवली- दिवा स्थानकांतील जलद मार्गावरील फलाटांवर लोकल आली नाही. तसेच धीम्या मार्गावरील लोकल २० मिनिटे विलंबाने धावल्या. कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची लांब रांग लागली होती. साधारण दीड तासानंतर कपलिंग जोडल्यानंतर सकाळी ११.४५ च्या सुमारास दुसऱ्या इंजिनाच्या साहाय्याने पंचवटी मुंबईच्या दिशेने धावली.
>कपलिंगची दुरुस्ती केल्यानंतर दुसºया इंजिनाद्वारे गाडी मुंबईकडे धावली. प्रवाशाना लांब पल्ल्याच्या गाडीतून प्रवाशांना मुंबईच्या दिशेने प्रवास करण्याची मुभा दिली होती.
- सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Web Title: Due to the coupling of Panchavati Express,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.