पैसे मागितल्याने तीन पोलिसांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 01:44 AM2019-04-15T01:44:10+5:302019-04-15T01:44:26+5:30
नाशिक-मुंबई महामार्गावर गस्त घालत असताना वासिंद-सारमाळ फाट्यालगत जनावरांचे मांस घेऊन जाणारा संशयास्पद टेम्पो कंटेनर अडवण्यात आला.
कसारा : नाशिक-मुंबई महामार्गावर गस्त घालत असताना वासिंद-सारमाळ फाट्यालगत जनावरांचे मांस घेऊन जाणारा संशयास्पद टेम्पो कंटेनर अडवण्यात आला. टेम्पो सोडून देण्यासाठी तडजोडीस तयार असल्याचे सांगणाऱ्या पोलिसांची माहिती टेम्पोमालक राहुल खोब्रागडे यांनी कोकण परिक्षेत्र आयुक्त नवल बजाज आणि ठाणे ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक पाटील यांना कळवली. मात्र, कागदोपत्री सगळे योग्य असतानाही गाडी अडवल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले म्हणून कंटेनर टेम्पोमालक यांच्या तक्रारीवरून पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी सापळा रचून ४० हजार रुपयांची देवाणघेवाण करताना दोन खाजगी व्यक्ती आणि पोलीस कर्मचाऱ्यांना शनिवारी पकडले.
दरम्यान, शनिवारी संध्याकाळी गस्त पथकातील उपनिरीक्षक शेंडे, कर्मचारी शेटे आणि इंगोळे यांनी मांस घेऊन जाणाºया या टेम्पोचालकास हटकले असता टेम्पो कंटेनरचालक शेख मेहमूद बेसुमार याने टेम्पोमालक राहुल खोब्रागडे यांना कळवले. खोब्रागडे यांनी उपनिरीक्षक शेंडे यांना सदर प्रकार मिटवा, असे सांगितले. मात्र, अवैध गोमांस आहे, त्यामुळे तुमच्यावर कारवाई होणार. तुम्ही टेम्पो पोलीस ठाण्यात घ्या, असे चालकाला सांगितले. याचवेळी सोबत असलेले पोलीस कॉन्स्टेबल शेटे आणि पोलीस शिपाई इंगोले यांच्यासह अरु ण व राऊत या दोन खाजगी व्यक्तींनी टेम्पोचालकास तडजोडीस तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर सापळा रचून पोलीस कर्मचाºयांना अटक करण्यात आली.
याप्रकरणी पुढील तपास पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण डॉ. शिवाजीराव राठोड, उपअधीक्षक संजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी गोडबोले पुढीत तपास करत आहेत.