कर्तव्यदक्ष पोलीस हवालदारामुळे तरुणाचा ६० हजारांचा मोबाईल पुन्हा मिळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 10:50 PM2017-09-04T22:50:33+5:302017-09-04T22:51:02+5:30
कापूरबावडी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस हवालदार विनोद चौगुले यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे अक्षय खरे (३२, रा. खारेगाव)यांचा ६५ हजारांचा मोबाईल गहाळ झाल्यानंतर तो सुखरुप परत मिळाला.
ठाणे, दि. 4 - कापूरबावडी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस हवालदार विनोद चौगुले यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे अक्षय खरे (३२, रा. खारेगाव)यांचा ६५ हजारांचा मोबाईल गहाळ झाल्यानंतर तो सुखरुप परत मिळाला. ओळख पटल्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या हस्ते त्यांना तो सोमवारी सुपूर्द करण्यात आला.
रविवारी कापूरबावडी नाक्यावर भर पावसामध्ये डयूटीवर असलेल्या चौगुले यांना एका नामांकित कंपनीचा मोबाईल रस्त्यावर पडलेला आढळला. सध्याच्या बाजारभावात ६५ हजारांचा असलेला हा मोबाईल कोणाचा आहे? याचा त्यांनी शोध सुरु केला. त्याबाबतची कापूरबावडी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गोपाळ कोळी यांनाही माहिती दिली. शोधा शोध केल्यानंतर हा मोबाईल खरे यांचा असल्याचे समजल्यानंतर त्यांना कोळी यांच्या उपस्थितीमध्ये उपायुक्त काळे आणि हवालदार चौगुले यांनी तो मोबाईल खरे यांना सुपूर्द केला. आपला मोबाईल सुखरुपपणे परत मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करीत पोलिसांचे आभार मानले.