वाहतूक पोलिसांच्या दक्षतेमुळे ठाण्यात १६ प्रवासी बचावले

By admin | Published: June 1, 2017 03:25 AM2017-06-01T03:25:11+5:302017-06-01T03:25:11+5:30

मद्यप्राशन करून एसटी चालवणाऱ्या भिकणराव पाटील (३०) याने घोडबंदर रोडवरील सिग्नल तोडून बस सुसाट नेल्यानंतर वाहतूक

Due to the efficiency of traffic police, 16 passengers in Thane escaped | वाहतूक पोलिसांच्या दक्षतेमुळे ठाण्यात १६ प्रवासी बचावले

वाहतूक पोलिसांच्या दक्षतेमुळे ठाण्यात १६ प्रवासी बचावले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मद्यप्राशन करून एसटी चालवणाऱ्या भिकणराव पाटील (३०) याने घोडबंदर रोडवरील सिग्नल तोडून बस सुसाट नेल्यानंतर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून पाच हजारांची अनामत रक्कम घेतली. चालकाचा बेदरकारपणा वाहतूक पोलिसांच्या वेळीच निदर्शनास आल्यामुळे सुदैवाने मोठा अपघात टळला आणि बसमधील १६ प्रवासी बचावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नालासोपारा ते ठाणे ही एसटी मंगळवारी रात्री ९.३० वा.च्या सुमारास घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड सिग्नलजवळ आली. हा सिग्नल तोडून चालकाने तशीच गाडी भन्नाटपणे दामटली.

Web Title: Due to the efficiency of traffic police, 16 passengers in Thane escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.