खोदकामामुळे महानगरची गॅसलाइन फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:14 AM2019-06-10T00:14:22+5:302019-06-10T00:14:56+5:30

ठामपाची निष्काळजी : ३० सोसायट्यांमधील ६०० कुटुंबीयांना फटका

Due to the excavation, the gas line fluctuates | खोदकामामुळे महानगरची गॅसलाइन फुटली

खोदकामामुळे महानगरची गॅसलाइन फुटली

Next

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे नितीन कंपनी ते कॅडबरी कंपनीदरम्यान असलेल्या सेवारस्त्यावरील महानगर गॅस कंपनीची वाहिनी फुटल्याची घटना रविवारी दुपारी घडली. ठाणे अग्निशमन दल आणि महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी तातडीने धावपळ करत दोन तासांमध्ये हा गॅसपुरवठा पूर्ववत केला. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.

नितीन कंपनी ते कॅडबरी कंपनीच्या मार्गावरील मुंबईकडे जाणाºया सेवारस्त्यावर दर्यासागर हॉटेलच्या समोरच ठाणे महापालिकेच्या वतीने मलनि:सारणवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. याच ठिकाणी महानगर गॅस कंपनीची भूमिगत वाहिनी गेलेली आहे. महानगरची कोणतीही परवानगी न घेता ठामपाच्या ठेकेदाराने रविवारी आपले काम सुरूच ठेवले होते. यात सकाळी ११.३० वा.च्या सुमारास जेसीबीचा फटका बसल्याने ही वाहिनी अचानक फुटली. गॅसगळती सुरू झाल्यानंतर याठिकाणी काम करणाºया कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.
ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि या घटनास्थळासमोरील बाजूला असलेल्या ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी याठिकाणी तातडीने धाव घेतली. महानगर गॅसच्या अधिकाºयांना याबाबतची माहिती त्यांनी प्रभारी अधिकारी
नितीन पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी १.३० पर्यंत हा गॅसपुरवठा पूर्ववत केला. साधारण, २५ ते ३० सोसायट्यांमधील ६०० कुटुंबीयांना या गॅसगळतीचा फटका बसला होता.
 

Web Title: Due to the excavation, the gas line fluctuates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.