ठाण्यात पुढील 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे मनपा आयुक्तांचं आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 07:24 PM2017-08-29T19:24:47+5:302017-08-29T20:19:29+5:30

गेल्या दोन दिवसांपासून ठाणे शहरात मुसळधार पाऊस पडत असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 48 तासांतही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे

Due to excessive warning in next 48 hours in Thane, Municipal Commissioner | ठाण्यात पुढील 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे मनपा आयुक्तांचं आवाहन 

ठाण्यात पुढील 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे मनपा आयुक्तांचं आवाहन 

googlenewsNext

ठाणे, दि. 29 - गेल्या दोन दिवसांपासून ठाणे शहरात मुसळधार पाऊस पडत असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 48 तासांतही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे शहरातील सखल भागात पाणी साचले असून महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा 24 तास कार्यरत आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी टोल फ्री 1800 222 108, दूरध्वनी क्रमांक 25371010, 25399828, 25374578 ते 82, 25399617 आणि 25392323 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.  तरीही नागरिकांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणेकरांना केले आहे.  
 

महावितरणचे आवाहन

मुंबई आणि परिसरातील अतिवृष्टीमुळे महावितरणच्या काही सब स्टेशनमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे काही ठिकाणीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन महावितरणने वीज पुरवठा बंद केला आहे. परिणामी ठाणे शहरातील काही परिसरात अंधार पसरला आहे. ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महावितरणनं वीजपुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेतला आहे. काही परिसरातील जागरूक नागरिकही त्यांच्या स्थानिक परिसराची माहिती देत आहेत. तेथेही महावितरणचे अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेऊन आहेत. पावसाचे पाणी ओसरताच सुरक्षेचा आढवा घेऊन वीज पुरवठा सुरू करण्यात येणार आहे. या परिस्थित नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या मुख्य अभियंता श्रीमती पुष्पा चव्हाण यांनी केले आहे. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन असून ते फिल्डवर कार्यरत आहेत. ग्राहकांनी परिस्थितीनुसार तसंच गरजेनुसार आपल्या नजिकच्या कार्यालयाशी / संबंधित अधिका-यांशी  अथवा १८००-२३३-३४३५ किंवा  १८००-२००-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: Due to excessive warning in next 48 hours in Thane, Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.