ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर मनभावन कवितांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 04:21 PM2018-05-22T16:21:46+5:302018-05-22T16:21:46+5:30
ब्रह्मांड कट्टय़ावर दोन मैत्रिणीच्या भावस्पर्श कवितांची मैफल मनभावन हा स्वरचित कवितांचा कार्यक्रम आयोजित केला होती. हा कार्यक्रम तनुजा इनामदार, पुर्णिमा नार्वेकर यांनी सादर केला.
ठाणे : ब्रह्मांड सामाजिक-सांस्कृतिक मंडऴा तर्फे ब्रह्मांड कट्टयावर सांज-स्नेह सभागृह, ब्रह्मांड पोलीस चौकी मागे, आझादनगर, ठाणे येथे झालेला कार्यक्रमात दोन मैत्रिणींच्या भावस्पर्श कवितांची मैफल... मनभावन हितगुज मनाशी भावनांचे (स्वरचित कवितांचा कार्यक्रम) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कवितेचा कार्यक्रम तनुजा इनामदार (पुणे) व पुर्णिमा नार्वेकर (मुंबई) या दोन मैत्रिणीनी सादर केला.
कवितांच्या या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले आणि कविवर्य मंगेश पाडगावकर आणि अरुण दाते यांना अभिवादन करून झाली पूर्णिमा नार्वेकर यांनी त्यांच्या, होते असे कधी कधी भेट, आई चे बोल आता आठवले त्याचा दिनक्रम, प्रेम तुझे माझे, स्टेटस मध्यम वर्गीय माणसाचे, मनातला पाऊस, पाऊस- पाऊसमहागाई, कहाणी साठीची, किती पावसाळे पाहिलेत मी, तर तनुजा इमानदार यांनी तृणपणें, आठवणीच पान, चारोळी, तुझं माझं घर असावं, अपेक्षा, हाक, देवा देवा ऐक ना, आयुष्य म्हणजे सर्कस, पहिली भेट, पाऊस वेळा, सॅन्डऑफ पार्टी, प्राजक्त, आता मात्र हद्द झाली, अशा कविता सादर केल्या. बालपण ते निवृत्ती नंतरचे दिवस या सर्व आठवणींनाचा कोलाज दोघींनि सादर केलेल्या कवितानमधून रसिकांसमोर तयार झाला.कार्यक्रमाचा शेवट होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या टायटल सॉंग च्या विडंबन काव्याने झाला. ज्याला रसिकांनी ही भरभरून दाद दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयोजक राजेश जाधव यांनी केले तर पाहुण्याचा परिचय अध्यक्ष महेश जोशी व स्वागत प्रगती जाधव यांनी केले.