दाट धुक्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने, प्रवासी हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2017 09:43 AM2017-09-04T09:43:40+5:302017-09-04T10:37:28+5:30

मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर दाट धुक्यामुळे परिणाम झाल्याचे वृत्त समोर आले आहे. डोंबिवली, कल्याण परिसरात दाट धुकं पसरल्यामुळे सीएसटीकडे येणारी वाहतूक उशीरानं सुरू आहे.

Due to heavy fog, the delay in transport of Central Railway, | दाट धुक्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने, प्रवासी हैराण

दाट धुक्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने, प्रवासी हैराण

Next

डोंबिवली, दि. 4 -  मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर दाट धुक्यामुळे परिणाम झाल्याचे वृत्त समोर आले आहे. डोंबिवली, कल्याण परिसरात दाट धुकं पसरल्यामुळे सीएसटीकडे येणारी वाहतूक उशीरानं सुरू आहे. मध्य रेल्वेच्या सततच्या खोळंब्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळेत मध्य रेल्वेवरील वाहतूक उशीरानं सुरू असल्यानं प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.  कर्जत ते ठाणेदरम्यान सोमवारी (4 सप्टेंबर) धुक्याची सादर पसरल्याचं चित्र पाहायला मिळाले. या कारणामुळे रेल्वेची वाहतूक जवळपास अर्धा तास उशिराने असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.  सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अनेक लोकल उशिराने धावत होत्या, तशी घोषणा मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली.
 

Web Title: Due to heavy fog, the delay in transport of Central Railway,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.