दमदार पावसामुळे चिखलोली धरण भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:12 AM2018-07-11T01:12:04+5:302018-07-11T01:12:35+5:30

अंबरनाथमधील चिखलोली धरण मंगळवारी सकाळपासून भरून वाहू लागले आहे. मागील आठवड्याभरापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे हे धरण काही दिवसातच भरले आहे.

Due to the heavy rain, the Chikhhololi dam is full | दमदार पावसामुळे चिखलोली धरण भरले

दमदार पावसामुळे चिखलोली धरण भरले

Next

अंबरनाथ : अंबरनाथमधील चिखलोली धरण मंगळवारी सकाळपासून भरून वाहू लागले आहे. मागील आठवड्याभरापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे हे धरण काही दिवसातच भरले आहे. या धरणातून बाहेर पडणाºया पाण्याच्या ओढयावर भिजण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढणार आहे.
अंबरनाथमध्ये शहराला पाणीपुरवठा करणारे चिखलोली धरण भरून वाहू लागले आहे. या धरणातून अंबरनाथ पूर्व भागात रोज सहा दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. उन्हाळ्यात या धरणात कंपन्यांचे रसायन गेल्याने हे पाणी दूषित झाले होते. त्यामुळे या धरणातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र पावसाने जोरदार हजेरी लावल्यावर पाण्याची पातळी वाढल्याने दूषित पाण्याचे प्रमाण कमी झाले होते. त्यानंतर या धरणातील पाण्याचा नागरिकांसाठी पुन्हा पुरवठा सुरू करण्यात आला. तीन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने धरण भरून वाहू लागले आहे. दरम्यान, या ठिकाणी येणाºया पर्यटकांना धरण पात्रात उतरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

गाडी अडकली

अंबरनाथ : बेलवलीतील भुयारी मार्गात सोमवारी गाडी अडकली होती. स्थानिकांनी प्रवाशांची सुखरुप सुटका केली. नियोजन न करता हा मार्ग बांधल्याने येथे कायमच पाणी असते. पावसाळ््यात त्यामध्ये वाढ होते. तरीही रेल्वे हा मार्ग बंद करत नाही.

जोरदार पावसामुळे बिरवाडी पूल वाहतुकीसाठी बंद

मुरबाड : तालुक्यातील बिरवाडी, मासले, बेलपाडा, फणसवाडी, शिखरपाडा, उंबरवेढे या गावांना जोडणाºया बिरवाडी नदीवरील नवीन पुलाचे काम सध्या सुरू आहे. मात्र, हे काम निकृष्ट असल्याने येथून वाहतूक सुरू नव्हती. तर जुन्या पुलावरूनच वाहने ये - जा करत होती. आता हा जुना पूल नादुरूस्त झाला आहे तसेच त्याची संरक्षण भिंत जोरदार पावसामुळे वाहून गेली आहे. त्यामुळे आता हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. परिणामी, नागरिकांना १५ किमी.ची पायपीट करावी लागते आहे. मुरबाड - कल्याणकडे जाणाºया चाकरमान्यांना तसेच विद्यार्थ्यांना बेलपाडा या गावातून जावे लागत आहे.

तरूणाचा मृत्यू
भिवंडी : शहरातील चाविंद्रा भागातील अवचितपाडा येथे एक मजली घराचे प्लास्टर तेथे झोपलेल्या सैजू दासन पुत्तलतोडी (२८) याच्या अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाकडे नव्हती. झमझम हॉटेल शेजारी एकमजली घर व तळमजल्यावर किराणा दुकान आहे. दुकानाजवळील घरात तो आपल्या साथीदारांसह राहत होता. सोमवारी रात्री तो दुकान बंद करून झोपला असता त्याच्या घराच्या प्लास्टरचा काही भाग मंगळवारी पहाटे त्याच्या अंगावर कोसळला.

उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला

उल्हासनगर : संततधार पावसामुळे वालधुनीला पूर आल्याने अनेक झोपडपट्टयात पाणी शिरले. तर शांती पॅलेस इमारतीचा स्लॅब कोसळल्याने ती रिकामी करून सील केली. गोलमैदान, शांतीनगर, शहाड फाटक, मयूर हॉटेल, नेहरू चौक आदी परिसरात पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप आले होते.कॅम्प नं-२ खेमानी येथे पाच मजली शांती पॅलेस इमारत आहे. महापालिकेने इमारतीला यापूर्वीच धोकादायक म्हणून जाहीर केले.
रात्री ११ च्या दरम्यान इमारतीच्या पाचव्या मजल्याचा स्लॅब कोसळल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडून ते पळू लागले. मंगळवारी सकाळी ११ वाजता आयुक्त गणेश पाटील यांच्यासह प्रभाग अधिकारी भगवान कुमावत, गणेश शिंपी यांनी इमारतीची पाहणी करून २३ कुटुंबांनाचे साहित्य बाहेर काढण्याची परवानगी देत इमारत सील केली. वालधुनी नदीचे पाणी अयोध्यानगर, पंचशीलनगर, मातोश्री मीनाताई ठाकरेनगर, रेणूका सोसायटीमधील झोपड्यांमध्ये शिरले. तीन ते चार ठिकाणी झाडे उन्मळून पडली.दरम्यान, या घटनेने धोकादायक इमारतींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नागरिकांसाठी मीरा रोडमध्ये बोटसेवा सुरूच


मीरा रोड : मुसळधार पावसामुळे मंगळवारीही मीरा-भार्इंदरमध्ये पूरिस्थती कायम राहिली. अनेक भागातील टाक्यांमध्ये सांडपाणी गेल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मीरा रोडच्या सिल्वर सरिता भागात मंगळवारीही अग्निशमन दलाने बोटसेवा चालवली.
उत्तनच्या नवीखाडी, करईपाडा, पाली भागात धावगी डोंगरावरून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात साचले. सकाळपासूनच या भागातील बस व अन्य वाहनसेवा बंद झाली. मच्छीमार नेते बर्नड डिमेलो यांनी पाणी साचण्याच्या कारणाचा शोध घेतला असता पालीबीच रिसॉर्टजवळील नैसर्गिक नाला हा पूर्णपणे भराव करून बंद केल्याचे निदर्शनास आले. डोंगरावरून येणारा पाण्याचा लोंढा हा पालीगाव व पालीबीच येथील दोन्ही नाल्यातून समुद्रात जायचा. पण पालीबीच येथील नाला बंद झाल्याने पाण्याचा लोंढा पाली, करईपाडा, नवी खाडीकडे वळून मोठ्या प्रमाणात पाणी साचले.
मीरा रोडच्या सिल्वर सरिता भागात कमरे इतके साचलेले पाणी आजही ओसरले नव्हते. त्यामुळे अग्निशमन दलाने रहिवाशांसाठी बोटसेवा सुरू ठेवली.
 

Web Title: Due to the heavy rain, the Chikhhololi dam is full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.