महामार्गामुळे बळीराजावर गदा

By admin | Published: December 11, 2015 01:09 AM2015-12-11T01:09:20+5:302015-12-11T01:09:20+5:30

मुंबई बडोदा शहरांना जोडणारा महामार्ग तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या हितसंबधीतांना जमीन संपादित करताना देण्यात येणाऱ्या नुकसान

Due to the highway | महामार्गामुळे बळीराजावर गदा

महामार्गामुळे बळीराजावर गदा

Next

सुरेश काटे,  तलासरी
मुंबई बडोदा शहरांना जोडणारा महामार्ग तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या हितसंबधीतांना जमीन संपादित करताना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी तलासरीत गुरूवारी बैठक घेण्यात आली. यामध्ये महामार्ग जाणाऱ्या गावातील बाधीत शेतकरी, डहाणू उपविभागीय अधिकारी अंजली भोसले, तलासरीचे तहसीलदार गणेश सांगळे, हायवे अ‍ॅथॉरीटीचे प्रकल्प संचालक एम. टी. अत्तरदे उपस्थित होते.
या महामार्गामध्ये पालघर जिल्ह्यातील ६८ ते ११३ कि. मी. पर्यंतचा भाग येत असून यात तलासरी तालुक्यातील सुत्रकार, सावरोली, आंबेशेतगाव, मसानगाव, कोचाई, बोरमाळ, इ. गावातील जमिनीचे संपादन करण्यात येणार
आहे.
एक्सप्रेस महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या
जमिनी या कुळकायद्यानुसार, वनजमिनी तसेच पारसी सावकारांच्या आहेत.
या जमिनी संपादीत केल्याने बहुसंख्य आदिवासी शेतकरी भुमीहीन होणार आहेत. तसेच वर्षानुवर्षे जमिनी आदिवासी
कसत आहे. परंतु त्या अजुन पर्यंत शेठ सावकारांच्या नावे
असल्याने या जमिनीचा योग्य मोबदला आदिवासी शेतकऱ्याला मिळणार नसल्याने या कसत असलेल्या जमिनी प्रथम कसत असलेल्या शेतकऱ्यांच्या नावे मग त्या संपादीत करा असा एकसूर आजच्या बैठकी शेतकऱ्यांनी काढला.
> उपविभागीय अधिकारी अंजली भोसले यांनी जमिनी संपादित करताना त्या गावाचे पत्व वर्षातील जमीन खरेदी विक्री, बाजारभाव तसेच रेडीरेकनरच्या दरानुसार जमिनीचा मोबदला देणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न राहणार आहे. संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीतील घरांची सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मुल्यांकन करण्यात येणार असून फळझाडेचे मुल्यांकन कृषी विभाग तर वनझाडाचे मुल्यांकन वन विभागाकडून करण्यात येवून त्याचे दराचे दुप्पट दर देण्यात येणार आहे.

Web Title: Due to the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.