डोंबिबलीत लोकलमधील रेटारेटीच्या वादातून टोळक्याचा तरुणावर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 06:43 PM2017-10-04T18:43:41+5:302017-10-04T18:48:34+5:30

एल्फिस्टन रोड स्थानकाच्या रेल्वे पुलावरील दुर्घटना ताजी असतानाच डोंबिवलीतील एका तरूणावर मंगळवारी भयंकर प्रसंग उद्भवला. सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असलेल्या डोंबिवलीच्या स्थानकावर आलेल्या लोकलमधील रेटारेटीमुळे धीरज वसंत म्हसकर (२३)रा. सांगर्ली, समर्थ कृपा या प्रवाशाला चार जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला.

Due to the hustle and bustle of local residents in Dombibalit, a fierce attack on gangrape youth | डोंबिबलीत लोकलमधील रेटारेटीच्या वादातून टोळक्याचा तरुणावर जीवघेणा हल्ला

डोंबिबलीत लोकलमधील रेटारेटीच्या वादातून टोळक्याचा तरुणावर जीवघेणा हल्ला

Next

 डोंबिवली - एल्फिस्टन रोड स्थानकाच्या रेल्वे पुलावरील दुर्घटना ताजी असतानाच डोंबिवलीतील एका तरूणावर मंगळवारी भयंकर प्रसंग उद्भवला. सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असलेल्या डोंबिवलीच्या स्थानकावर आलेल्या लोकलमधील रेटारेटीमुळे धीरज वसंत म्हसकर (२३)रा. सांगर्ली, समर्थ कृपा या प्रवाशाला चार जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला. केडीएमटीचे ड्रायव्हर अवतारसिंग बलवेत यांच्या सतर्कतेमुळे त्या युवकाला वेळीच उपचार मिळाले तर एकाला पोलिसांच्या ताब्यात देणे शक्य झाले.
लोहमार्ग पोलीस डोंबिवली यांनी दिलेल्या माहितीनूसार धीरजवर केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तो ठाण्यातील एका फायनान्स कंपनीमध्ये नोकरी करतो. नेहमीप्रमाणे तो डोंबिवली स्थानकात तो फलाट क्रमांक ३ वर सकाळी ९ वाजून २० मिनिटांची लोकल पकडण्यासाठी उभा होता. टिटवाळ्याहून सीएसटीकडे जाणारी लोकल डोंबिवलीत आली होती, पण ती गर्दीने खचाखच भरली होती. त्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्नात असतानाच धीरजची बॅग एका प्रवाश्याला लागली. या प्रवाश्याने कॉलर पकडून गळ्याला धरत खाली खेचले. गर्दीच्या रेट्यामुळे धीरज फलाटावर पडला. त्याला त्याच लोकलमधील ४जणांच्या टोळक्याने लाथा-बुक्क्याने झोडपले. धीरजने हल्लेखोरांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून पळ काढला. मात्र या टोळक्याने त्याला पुलावर गाठून तेथेही मारले. त्यातुन कसेबसे स्थानकाच्या बाहेर आल्यानंतर धीरजने त्यातील एका हल्लेखोराला पकडून ठेवले. हे दृश्य बघण्यासाठी स्थानकात गर्दी जमली. मात्र जखमी धीरजसाठी कुणीही पुढे आले नाही. तेवढ्यात हा प्रकार पाहून केडीएमटीचा बहादूर ड्रायव्हर अवतारसिंग बलवेत यांनी स्टेरिंगवरून उडी मारून घटनास्थळी धाव घेत, त्यांनी जखमी धीरजला धीर दिला. अचानक झालेल्या या घटनेमुळे धीरज घाबरला होता. ही घटना रामनगरहद्दीत घडल्याने काहींनी त्याला रामनगर पोलीस ठाण्यात नेले. पण घटनेची सुरुवात रेल्वे स्थानकातून झाल्याने त्याची तक्रार लोहमार्ग पोलीस ठाण्यात रात्री उशिराने वर्ग करण्यात आल्याचे पोलीस निरिक्षक गौरीप्रसाद हिरेमठ म्हणाले.
दरम्यान, धीरजच्या आई-वडीलांनी धीरज याला पालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये हलविले. या घटनेची खबर कळताच भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांनी कार्यकर्त्यांसह हॉस्पिटलमध्ये जाऊन धीरज याच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच पाटील यांनी तातडीने उपचार देण्यासंदर्भात तेथिल वैद्यकीय आरोग्य अधिका-यांना सूचना केल्या. हॉस्पिटलच्या वैद्यकिय अधिका-यांनीही तपासणी केल्याचे पाटील म्हणाले. लोहमार्ग पोलिसांनी टोळक्यातील एका हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. जखमी धीरज याच्या जबानीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने उपलब्ध झालेल्या पुराव्यांवरून पोलिस अन्य हल्लेखोरांचा शोध घेत असल्याचे हिरेमठ म्हणाले. धीरजने देखिल शिविगाळ केली, आधी मारामारीला सुरुवात केली, त्यामुळे नेमका गुन्हा दाखल करावा की न करावा याचा तपास लोहमार्ग पोलीस करत असून चाप्टरची केस लावण्यात येइल असे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.
परिवहनचे चालक अवतारसिंग बलवेत यांच्या सतर्कतेमुळे त्या युवकाची मारहाणीतुन सुटका झाली, तसेच त्याला योग्यवेळी उपचार मिळाले. त्यांच्या प्रसंगावधानाची दखल घेत प्रोटेस्ट अगेन्स्ट आॅटोवाला या मंचच्या वतीने अवतारसिंग यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती मंचचे प्रमोद केणे यांनी दिली.

Web Title: Due to the hustle and bustle of local residents in Dombibalit, a fierce attack on gangrape youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.