पालिकेच्या दुर्लक्षामुळे ‘कामवारी’ प्रदूषणाच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 03:29 AM2018-06-18T03:29:40+5:302018-06-18T03:29:40+5:30
कामवारी नदी वाहत असलेल्या परिसराजवळ सुमारे १५ गावांचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. शहरीकरण होत असताना अशा गावात जल व मलनि:सारणाची स्वतंत्र व्यवस्था नसल्याने अनेक गावातून निघणारे सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. शेलार गावाच्या सीमेवर व भिवंडी शहराच्या सीमेवरील नदीपात्रात नागरिकांनी अतिक्रमणे करून इमारती बांधल्या आहेत. या इमारतीमधून निघणारे सांडपाणी नदीपात्रात सोडले जाते. या बाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही जिल्हाधिकाऱ्यांसह भिवंडी पालिका आयुक्तांनी कोणतीही कारवाई केली नाही. दरवर्षी याच नदीपात्रात सर्व गावातील गणेशमूर्तींचे विसर्जन होत असते. त्याचप्रमाणे शेलार येथील धरणावर हजारोंच्या संख्येने लहान-मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन होते. परंतु त्यामुळे दरवर्षी वाढत असलेल्या गाळाकडे व प्लास्टरच्या साठ्याकडे गणेश भक्तांसह सरकारी यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी शेलार नदीचे पात्र गाळाने भरले आहे.
पावसाळ्यात या पात्रात पाणीसाठण्याची क्षमता नसल्याने ते पाणी उलटून जाते. तर शेलार परिसरातील डार्इंगला लागणाºया पाण्यासाठी कामवारी नदीतील पाण्याचा उपसा केला जातो. त्यामुळे मागील काही वर्षापासून धरणाजवळील नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे झाले होते. मे महिन्याच्या सुटीत या कोरड्या पात्रात मुलांना खेळण्यासाठी आयते मैदान मिळाले होते. याची दखल घेत गेल्यावर्षी उपविभागीय अधिकाºयांच्या परवानगीने शेलार ग्रामपंचायतीने सीएसआर फंडातून धरणाजवळील काही अंशी गाळ काढला.त्यामुळे यावर्षी पात्रात थोडेफार पाणी जमा झालेले दिसून आले.
या नदीच्या गोड्या पाण्यात गावातून मिसळल्या जाणाºया सांडपाण्याने व शेलारमधील काही डार्इंगच्या रासायनिक पाण्याने ग्रासलेली आहे. पावसाळ्यात नदीतून वाहणारे पाणी नियोजन करून साठवले व त्या पाण्यावर प्रक्रीया केल्यास शहरातील फार मोठ्या भागास पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकते. तसेच पावसाळ्यात प्रवाहीत होणाºया या नदीचे पुरूज्जीवन झाल्यास पावसाळ्यानंतर प्रचंड पाण्याचा साठा निर्माण होऊ शकतो. पावसाळ्यानंतर नदीच्या उगमापासून ते शेलारपर्यंत साठवलेले पाणी शेतीसह मासेमारीसाठी उपयोगात आणता येणे शक्य आहे. शेलार नदीनाका भागात नदीचे पाणी डार्इंग कंपन्यांना काही टँकरचालक विकतात. सरकार किंवा भिवंडी महापालिकेने या पाण्यावर प्रक्रिया करून ते नागरिकांना व डार्इंगमालकांना विकल्यास त्यामधून उत्पन्न मिळू शकते. सध्या नदी प्रदूषणाने ग्रासल्याने त्याचा फारसा शहरासाठी उपयोग होत नाही.
ज्याप्रमाणे उल्हास आणि वालधुनी नद्यांच्या पुनरूज्जीवनासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, तसेच कामवारी नदीसाठी झाल्यास व त्यातील प्रदूषण रोखल्यास नदीचे पाणी पिण्यायोग्य व इतर कामासाठी वापरता येणे शक्य आहे. कामवारी नदीतून केवळ पावसाचे पाणी वाहते. नदीला झरे वा अन्य स्वत:चे स्त्रोत नसल्याने हे पाणी पावसाळ्यात प्रवाहित असते. त्यानंतर पाणी आटल्याने नदीपात्रात बेकायदा बांधकामे झाली आहेत. त्यापैकी शेलार गावात आणि महापालिका क्षेत्रात ही बेकायदा बांधकामे जास्त आहेत.
अर्थकारणाच्या योजनांना प्राधान्य
सरकार एका बाजूला जलस्त्रोत निर्माण करण्याकरिता विविध योजना जाहीर करत आहेत. मात्र ग्रामीण सत्तेत असलेले राजकारणी शेतकºयांच्या अथवा गावाच्या भविष्याच्या योजनेपेक्षा अर्थकारणाच्या योजनांना प्राधान्य देताना दिसतात. अधिकारी देखील स्वत:ची कॉलर टाईट करण्यासाठी बंधारे बांधून पाणी साठवल्याचे फोटो जपतात. परंतु पावसाळ्यात किती पाणी साठवले जाते,याचा ताळमेळ स्थानिक लघु-पाटबंधारे विभागाकडे नाही.
जलस्त्रोत निर्माण करण्यासाठी नदी असूनही तिचा वापर केला जात नाही ही शोकांतिका आहे. जर नेते, अधिकाºयांनी इच्छाशक्ती दाखवली तर भविष्यात या नदीचा कायापालट होऊ शकतो. त्याकरिता काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. शहरातील नागरिकांनी ही मंडळी करतील या आशेवर किंवा काहीच करणार नाही, या नैराश्येपोटी हातावरहात ठेवून बसण्यात काही अर्थ नाही. उलट नागरिकांनी यंत्रणा आणि नेत्यांवर दबाव आणून कामवारी नदीला चांगले रूप देणे गरजेचे आहे.पाणीसाठवणुकीसाठी योजना हवी
या नदीचा प्रवाह चावे गावातून मोठा होत जातो. त्यामुळे लघु-पाटबंधारे विभागामार्फत चावे, निवळी, पुंडास, सोनटक्का, रामवाडी, खांडपे, सावंदे-गोरसई, आवळवट्टे, विश्वभारती व नदीनाका या ठिकाणी मिळून एकूण १७ बंधारे बांधले असून त्यामध्ये केवळ सावंदे-गोरसई येथे कोल्हापूर बंधारा तसेच विश्वभारती आणि नदीनाका येथे खाजगी बंधारा बांधला आहे. मात्र जिल्हा परिषदेचा पाटबंधारे विभाग व पंचायत समितीतील लघु पाटबंधारे विभागाने कामवारी नदीसह वारणा नदीत पाणी साठवणूक करण्यासाठी स्वतंत्र योजना केली पाहिजे.
>घाट बांधल्यास चौपाटीसारखा उपयोग
वास्तविक नदी किनाºयावरील लोकवस्तीच्या गावांनी नदीचे पाणी टिकवण्यासाठी झाडे लावून पाणी जिरवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. परंतु बºयाच ठिकाणी नदीचे पाणी पावसाळ्यानंतर पंपाद्वारे खेचून त्यावर भाजीपाला व फळभाज्यांचे उत्पन्न घेण्याकडे ग्रामस्थांचा अधिक कल असतो.
मात्र नदीच्या विविध स्त्रोतांच्या ठिकाणी बंधारे अथवा जलयुक्त शिवार, बंधारे व झाडे लावून पाणी जिरवणे शक्य आहे. एखादा घाट बांधल्यास त्याचा उपयोग विरंगुळासाठी अथवा फिरण्यासाठी चौपाटी म्हणूनही करता येईल. त्यामधूनही रोजगार निर्माण करता येणे शक्य आहे.
>बोटिंगची सुविधा उपलब्ध करणे शक्य
शेलार ग्रामस्थांनी धरण परिसरांत असा चौपाटीचा प्रयत्न केला होता. परंतु पाणी व टँकरमाफियांमुळे हा प्रयत्न पुढे आला नाही. शेलार गावातील गणेश घाटावर गणपती विसर्जनाच्या काळात गांभीर्याने लक्ष दिले जाते. परंतु त्यानंतर या घाटाकडे कुणी फिरकतही नाही. वास्तविक शेलार,अनगाव, कवाड, म्हापोली आदी गावांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
त्याचबरोबर शेलार गावातील डार्इंग कंपन्यांमुळे प्रदूषणही वाढत आहे. यासाठी गावातील नदीकिनाºयावरील अतिक्रमणे हटवून तेथे घाट बांधून चौपाटी करणे शक्य आहे.तसेच गोरसई येथे नदीचे पात्र मोठे असून
तेथे बोटींग करणे देखील शक्य आहे.