पालकांचा शोध न लागल्यामुळे ठाण्यातील चार वर्षांच्या मुलीची बालसुधारगृहात रवानगी

By जितेंद्र कालेकर | Published: October 4, 2018 07:13 PM2018-10-04T19:13:24+5:302018-10-04T19:16:26+5:30

एक आठवडयांपूर्वी ठाण्याच्या नौपाडा भागातून आई वडीलांपासून अचानक हरविलेल्या एका चार वर्षीय मुलीच्या पालकांचा शोध लागला नाही. उपचारानंतर अखेर तिला नेरुळच्या विश्व बालक केंद्र या बालसुधारगृहकडे संगोपनासाठी नौपाडा पोलिसांनी बुधवारी सुपूर्द केले.

 Due to lack of parental discovery, a four-year-old girl from Thane will be brought to the nursery home | पालकांचा शोध न लागल्यामुळे ठाण्यातील चार वर्षांच्या मुलीची बालसुधारगृहात रवानगी

आठवडाभरानंतरही पालकांचा शोध सुरुच

Next
ठळक मुद्देआठवडाभरानंतरही पालकांचा शोध सुरुचपोलीस आणि रुग्णालयाने केला सांभाळपंजाबी ड्रेसमधील महिला आढळली सीसीटीव्हीमध्ये






लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे:

ठाणे: एक आठवडयांपूर्वी नौपाडयातील हनुमान मंदिराजवळील एका पदपथावर जखमी अवस्थेत मिळालेल्या चार वर्षीय मुलीच्या पालकांचा शोध न लागल्यामुळे बाल कल्याण समितीच्या सूचनेनुसार तिची नौपाडा पोलिसांनी नेरुळच्या बालसुधारगृहात बुधवारी रवानगी केली. या मुलीच्या पालकांचा अजूनही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.


ही मुलगी २७ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वा. च्या सुमारास रडतांना काही दक्ष नागरिकांना आढळली. ठाण्यातील कराटे प्रशिक्षक देविसिंग राजपूत यांनी तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर नौपाडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हणमंत ओऊळकर यांनी तिची विचारपूस करुन पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ३ आॅक्टोंबर रोजी जिल्हा रुग्णालयातून तिला सोडण्यात आले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने तिला पुन्हा नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, भिवंडीच्या बाल कल्याण समितीकडे पोलिसांनी या मुलीची माहिती दिल्यानंतर तिला बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार नवी मुंबईतील नेरुळ भागातील ‘विश्व बालक केंद्र’ या बालसुधारगृहात तिला ओऊळकर यांच्या पथकाने सोडले. कधी आईने सोडले, कधी बहिणीने बांधले अशी प्रत्येकवेळी वेगवेगळी माहिती देणाऱ्या या मुलीला नावही सांगता न आल्यामुळे तिच्या पालकांचा शोध घेण्यात अजूनही अडचणी येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या मुलीच्या पालकांचा शोध घेण्यासाठी नौपाडा तसेच ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील १५ ते २० सीसीटीव्हींची पडताळणी करण्यात आली. या दोन ठिकाणांच्या सीसीटीव्हींमध्ये एक पंजाबी ड्रेसमधील महिला या मुलीला सोडून गेल्याचे दिसते. हीच महिला पुढे अलोक हॉटेल परिसरात दिसते. त्यानंतर मात्र ती दिसेनाशी होते. प्रचंड शोध घेऊनही तिच्या पालकांचा शोध न लागल्यामुळे अगदी नाईलाज म्हणून या मुलीला बालसुधारगृहात ठेवण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले. या मुलीबाबत किंवा तिच्या पालकांबाबत ज्यांना माहिती असेल त्यांनी नौपाडा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी केले आहे. तिला सोडणाºया महिलेने तिचे अपहरण केले होते की, तिची ती आई होती, हे स्पष्ट झालेले नाही. ही मुलगी चुकून पालकांच्या हातून निसटली की तिला हेतूपरस्सर सोडण्यात आले, याही बाबींचा शोध घेण्ेयात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

...........................

Web Title:  Due to lack of parental discovery, a four-year-old girl from Thane will be brought to the nursery home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.