अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे ठाणे, रायगड जिल्ह्यातील शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 08:13 PM2019-08-04T20:13:16+5:302019-08-04T20:14:17+5:30

शाळकरी मुलांचे हाल टाळता येणार आहेत. 

Due to the possibility of heavy rainfall, schools in Thane and Raigad districts will be declared on Monday | अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे ठाणे, रायगड जिल्ह्यातील शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर

अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे ठाणे, रायगड जिल्ह्यातील शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर केली आहे.  हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार ५ ऑगस्ट रोजी देखील अतिवृष्टीची शक्यता

ठाणे - ठाणे जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार ५ ऑगस्ट रोजी देखील अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर केली आहे. तसेच रायगड जिल्ह्यात देखील मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत असल्याने  हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार ५ ऑगस्ट रोजी देखील अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ . विजय सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे शाळकरी मुलांचे हाल टाळता येणार आहेत. 

Web Title: Due to the possibility of heavy rainfall, schools in Thane and Raigad districts will be declared on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.