सिद्धेश्वर जलकुंभ दुरुस्तीमुळे उथळसरला १५ दिवस कमी दाबाने पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:40 AM2021-03-20T04:40:09+5:302021-03-20T04:40:09+5:30
ठाणे : उथळसर प्रभागसमितीअंतर्गत सिद्धेश्वर जलकुंभाचा जलकुंभ क्र. २ च्या टाकीच्या अंतर्गत छताच्या भिंतीचे संरक्षणात्मक दुरुस्तीचे काम हाती ...
ठाणे : उथळसर प्रभागसमितीअंतर्गत सिद्धेश्वर जलकुंभाचा जलकुंभ क्र. २ च्या टाकीच्या अंतर्गत छताच्या भिंतीचे संरक्षणात्मक दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी १५ दिवस लागणार असल्यामुळे २० मार्च ते ५ एप्रिल या कालावधीपर्यंत परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
या कालावधीत उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील खोपट, गोकुळदासवाडी, हंसनगर, परेरानगर, रमाबाई आंबेडकरनगर, लॉरी स्टॅन्ड, चरईतील धोबी आळी, आंबेडकर रोड, चंदनवाडी, पाचपाखाडी, नितीन कंपनी, सर्व्हिस रोड, पाटीलवाडी, भोलाभय्या चाळ, नुरीबाबा दर्गा रोड, अल्मेडा सिग्नल, कोलबाड, विकास कॉम्प्लेक्स व गोकुळनगर या शहरातील परिसरात बायपासपासून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरून महापालिकेस सहकार्य करावे,असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.