रेशनिंगच्या तुटवड्यामुळे सामान्य नागरिक अच्छे दिनापासून वंचित

By Admin | Published: August 24, 2015 11:13 PM2015-08-24T23:13:40+5:302015-08-24T23:13:40+5:30

एकीकडे जिल्हा पुरवठा विभाग शासनाकडून मिळणारे धान्याचे नियतन वेळेत वाटप केले जाते, असे म्हणणे असले तरी शहरासह जिल्ह्यातील रेशनिंग दुकानात गहू, तांदूळ, रॉकेलसह साखरेची

Due to the shortage of rationing, ordinary citizens are deprived of good days | रेशनिंगच्या तुटवड्यामुळे सामान्य नागरिक अच्छे दिनापासून वंचित

रेशनिंगच्या तुटवड्यामुळे सामान्य नागरिक अच्छे दिनापासून वंचित

googlenewsNext

ठाणे : एकीकडे जिल्हा पुरवठा विभाग शासनाकडून मिळणारे धान्याचे नियतन वेळेत वाटप केले जाते, असे म्हणणे असले तरी शहरासह जिल्ह्यातील रेशनिंग दुकानात गहू, तांदूळ, रॉकेलसह साखरेची नेहमीच बोंबाबोंब असल्याचा आरोप ठाणे जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या संघटनांकडून केला जात आहे. तर, शहरात पूर्वीच्या तुलनेत केला जात असलेला २०-२५ आणि ग्रामीण भागात ५-१० टक्के धान्य पुरवठा तोकडा पडत आहे. ठाणे शिधावाटप कार्यालयाच्या ‘फ’ या परिमंडळात ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर, नवी मुंबई या महानगरपालिक ांसह कुळगाव-बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिके तील कार्यक्षेत्रांचा समावेश आहे. तर, ठाणे जिल्हा पुरवठा विभागात जिल्ह्यातील (ग्रामीण) कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, शहापूर आणि मुरबाड या तालुक्यांचा समावेश आहे. ग्रामीण भागात १०६८ केरोसीन परवानाधारक आहेत. मंजूर नियतन दरमहिन्याला दिले जाते. यामध्ये गहू आणि तांदळाचे प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय अन्न योजनांतर्गत नियतन काढले जाते. तसेच रॉकेल आणि साखरेच्या मासिक नियतनानुसार पुरवण्यात येते.-पुरवठा विभाग शासनाकडून मिळणारे धान्य ग्रामीण भागात ५ ते १० तर शहरी भागात २० ते २५ टक्के कमी प्रमाणात उपलब्ध होते. सणाच्या दिनात सामान्यांना तेल, साखर, गहू, तांदूळ, डाळ मिळतच नाहीत. त्यातच रॉकेलची बोंब असल्याने सामान्य अद्यापही अच्छे दिनाच्या प्रतीक्षेत आहेत. नियमीत पुरवठाच होत नाही, तिथे सणासुदीला जास्तीची काय अपेक्षा करावी. - चंद्रकांत भोईटे, ठाणे जिल्हा नवी मुंबई व्यापारी उद्योजक महामंडळ, अध्यक्ष नारंगी पत्रिकाधारकांना शिधावाटप दुकानांतून मागील एक वर्षापासून गहू तसेच तांदूळ मिळत नाही. तो उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच अन्न सुरक्षेंतर्गत नाममात्र दरात रेशन दुकानांमध्ये मिळणारे अन्नधान्न सर्व केशरी कार्डधारकांना मिळावे, यासाठी त्याचा पुरवठा वाढविण्यात यावा. - सय्यद अली अशरफ, वेतन सल्लागार आयोगाचे अध्यक्ष शासनाकडून मंजूर होणारे नियतन दरमहिन्यास त्या-त्या तालुक्यांना दिले जाते. जर यामध्ये कोणी कुचराई करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत. त्यानुसार, कठोर कारवाई करण्यात येईल. - डॉ. मोहन नळदकर, ठाणे जिल्हा पुरवठा अधिकारी

Web Title: Due to the shortage of rationing, ordinary citizens are deprived of good days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.