सामाजिक दायित्वामुळे १० रुपयांत जेवण शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 11:08 PM2019-11-02T23:08:49+5:302019-11-02T23:09:00+5:30

दात्यांनी पुढे येण्याची गरज । अंबरनाथ-बदलापुरातील उपक्रम

Due to social responsibility, a meal can be made for 10 rupees like shiv sena | सामाजिक दायित्वामुळे १० रुपयांत जेवण शक्य

सामाजिक दायित्वामुळे १० रुपयांत जेवण शक्य

Next

पंकज पाटील

बदलापूर / अंबरनाथ : भुकेल्याला अन्न देणे हे पुण्याचे काम मानले जाते. त्यामुळेच अंबरनाथ आणि बदलापुरात वेगवेगळ्या संकल्पनांतून दोन ठिकाणी १० रुपयांत जेवण देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रत्यक्षात, चांगले जेवण १० रुपयांत देणे हे आर्थिकदृृष्ट्या अवघड असले तरी ही तारेवरची कसरत संयोजकांनी यशस्वीरीत्या सुरू केली आहे.

राज्यात शिवसेनेने १० रुपयांत, तर भाजपने ५ रुपयांत पोटभर जेवण देण्याची सवंग घोषणा निवडणुकीपूर्वी केली असली, तरी त्याआधीच अंबरनाथ-बदलापुरात सामाजिक बांधीलकीतून जेवणाच्या दर्जात तडजोड न करता १० रुपयांत जेवण देणे शक्य करून दाखविले आहे. अंबरनाथमध्ये गावदेवी चौकात १० रुपयांत जेवण देण्याची संकल्पना शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी राबवली आहे. दररोज दुपारी ३०० जणांच्या जेवणाची सोय केली जात आहे. ते देत असताना त्याचा दर्जा सांभाळला जात आहे. तो चांगला ठेवण्यासाठी स्वत: वाळेकर आणि त्यांचे कुटुंबीय लक्ष देत आहेत.
बदलापुरात कॅप्टन आशीष दामले यांनी ताईज् किचन नावाने १० रुपयांत जेवण देण्याचा उपक्रम राबविला. या ठिकाणी दुपारी २५० ते सायंकाळी १५० जणांना जेवण देण्यात येते. दररोज सरासरी ३५० ते ४०० नागरिक या ठिकाणी १० रुपयांत जेवण करतात. मात्र, ते करण्यासाठी दामले यांना एका वर्षाचे नियोजन आधीच करून ठेवावे लागत आहे. जेवणासाठी लागणारा भाजीपाला हा थेट जुन्नरहून मागविण्यात येतो. त्यामुळे भाजी स्वस्त मिळते, तर कडधान्य हे होलसेल मार्केटमधून आधीच भरून ठेवलेले असते. ते खरेदी करत असताना मार्केटमधील व्यापारीही आपला नफा बाजूला ठेवून कडधान्य विकतात. भाजी आणि कडधान्य या दोन वस्तू मदतीच्या स्वरूपात मिळविण्याचा प्रयत्न दामले यांच्यामार्फत सुरू असतो.
गॅस, तेल आणि गहू यापैकी दोन वस्तू मदत स्वरूपात मिळाल्यास १० रुपयांत दर्जेदार जेवण देणे शक्य आहे. प्रत्येक वाराची भाजी निश्चित असल्याने त्या प्रमाणात धान्य भरले जाते. त्यात मूग, मटकी, सोयाबिन, शेवभाजी, छोले यांचा प्रामुख्याने समावेश असतो. काही व्यक्ती या उपक्रमास स्वत:हून मदत करतात.

प्रत्यक्षात एकवेळचे जेवण देताना प्रत्येक ताट हे २० रुपयांच्या घरात जाते. परंतु, ते १० रुपयांत देत असताना त्यासाठी काही दानशूर व्यक्ती, संस्थांची मदत होते. कोणाचा वाढदिवस असेल, तर ती व्यक्ती जेवणाचा सर्व खर्च करते. तसेच काही व्यक्तींची आर्थिक मदत होते, तर काही वस्तूस्वरूपात धान्य देत असल्याने त्याचीदेखील मदत होते.

Web Title: Due to social responsibility, a meal can be made for 10 rupees like shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.