शुक्रवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडीतील सखल भागात साचलं पाणी

By नितीन पंडित | Published: July 20, 2024 05:23 PM2024-07-20T17:23:04+5:302024-07-20T17:23:45+5:30

पहाटे भाजी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची मार्केटमध्ये साचलेल्या पाण्यामुळे उडाली तारांबळ

Due to heavy rain since Friday night, water has accumulated in the low-lying areas of Bhiwandi | शुक्रवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडीतील सखल भागात साचलं पाणी

शुक्रवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडीतील सखल भागात साचलं पाणी

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरात शुक्रवारी रात्री पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा भिवंडी शहरातील अनेक सकल भागामध्ये सकाळी पावसाचे पाणी साचले होते.

शहरातील भाजी मार्केट, तीनबत्ती, गुलजार कोल्ड्रिंक्स गल्ली, बाजारपेठ या भागात पहाटे गुडघाभर पाणी साचले होते. या भागात पाणी साचल्याने पहाटे किरकोळ भाजी खरेदी साठी आलेली ग्राहकांची भाजी मार्केट मध्ये साचलेल्या पाण्यामुळे तारांबळ उडाली होती. सकाळी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर दुपारी पाणी ओसारण्यास सुरवात झाली. तर भिवंडी ठाणे रस्त्यावरील कोपर या ठिकाणी सुध्दा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते.त्यामुळे मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागत होता.

Web Title: Due to heavy rain since Friday night, water has accumulated in the low-lying areas of Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.