ठाण्यात पावसामुळे ठिकठिकाणी साचले पाणी.. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी..
By अजित मांडके | Published: June 28, 2023 03:25 PM2023-06-28T15:25:05+5:302023-06-28T15:25:37+5:30
सकाळच्या सुमारास नोकरीवर जाणाऱ्या चाकरमान्यांची मात्र दाणादाण उडालेली पाहायला मिळाली आहे.
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाण्यात यंदाच्या वर्षीही नालेसफाई आणि गटार सफाईची पोल खोल पावसाने केली आहे. ४ दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाण्यातील विविध परिसरात पाणी भरल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. ठाण्यातील वंदना सिनेमा परिसर, खारकराळी परिसर, जांभळी नाका परिसर, केसरमिल, कळवा पूर्व, मुंब्रा, दिवा या ठिकाणी सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पाहायला मिळाले आहे. त्यामुळे सकाळच्या सुमारास नोकरीवर जाणाऱ्या चाकरमान्यांची मात्र दाणादाण उडालेली पाहायला मिळाली आहे.
सकाळच्या सुमारास तारेवरची कसरत करून चाकरमान्यांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागला. तर या साचलेल्या पाण्यामुळे ठाण्यात ठीक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली. संत गतीने सुरु असलेल्या पाण्यामुळे शहरातील घोडबंदर रोड, ठाणे वागळे इस्टेट, ठाणे मुंबईला जोडणारे टोळ नाका तसेच माजिवडा येथील भिवंडी दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली आहे.
ठाण्यात पावसाचा जोर कायम..
ठाण्यात पावसाचा जोर वाढला असून दिवसभरात 105.16 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे...मुसळधार पावसाने ठाणे रेल्वे स्थानकाजवळ रुळावर काही प्रमाणात पाणी साचण्यास सुरवात झाली असली तरी रेल्वे सेवा सुरुळीत सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिलीय..रेल्वे यंत्रणा एलर्ट मोडवर आली असून पाणी जास्त वढल्यास सक्षन पंप द्वारे पाणी उपसा करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याची माहितीही देण्यात आलीय..