पावसाच्या रेड अलर्टमुळे ठाणे जिल्ह्यातील शाळांना उद्याही सुटी जाहीर

By सुरेश लोखंडे | Published: July 20, 2023 09:42 PM2023-07-20T21:42:15+5:302023-07-20T21:42:40+5:30

नागरिकांनीही अतिवृष्टीच्या काळात दक्षता घ्यावी. आपत्ती विषयक परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Due to the red alert of rain, schools in Thane district have been declared closed tomorrow, Friday | पावसाच्या रेड अलर्टमुळे ठाणे जिल्ह्यातील शाळांना उद्याही सुटी जाहीर

पावसाच्या रेड अलर्टमुळे ठाणे जिल्ह्यातील शाळांना उद्याही सुटी जाहीर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे :  जिल्ह्यास पुढील ४८ तास अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा हवामान खात्याने दिला आहे. अतिवृष्टीच्या इशारा गांभीर्याने घेऊन उद्या, २१ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील इयत्ता १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना जिल्हाधिकारी  अशोक शिनगारे यांच्या आदेशानुसार सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी.  आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.        

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील ४८ तासातही अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी जिल्ह्यातील यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सज्जता ठेवली आहे. प्रत्येक तालुका स्तरावर  महानगरपालिका स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.  जिल्हा प्रशासनाबरोबरच एनडीआरएफ, आपदा मित्र, टीडीआरएफची टीम सज्ज ठेवण्यात आली आहे.

नागरिकांनीही अतिवृष्टीच्या काळात दक्षता घ्यावी. आपत्ती विषयक परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

रायते पुल वाहतुकीसाठी खुला

कल्याण तालुक्यातील रायते पुलावर नदीच्या पाण्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. आज दुपारनंतर पुलावरील पाणी ओसरले आहे. नदीच्या पाण्यामुळे पुलावर अनेक ठिकाणी घाण साचली होती. राष्ट्रीय महामार्गाच्यावतीने ही घाण काढण्याचे काम सुरू केले आहे. तसेच काही प्रमाणात वाहतूक सुरु करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Web Title: Due to the red alert of rain, schools in Thane district have been declared closed tomorrow, Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस