महापालिका कामगारांच्या पगारावर लिपीकाने मारला डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 01:56 AM2019-02-23T01:56:46+5:302019-02-23T02:00:27+5:30
भिवंडी : संगणकातील डाटामध्ये फरक करून महानगरपालिका कामगारांच्या पगारावर डल्ला मारणाऱ्या लिपीका विरोधात विधी अधिकाºयांनी पोलीसांत गुन्हा दाखल केला ...
भिवंडी: संगणकातील डाटामध्ये फरक करून महानगरपालिका कामगारांच्या पगारावर डल्ला मारणाऱ्या लिपीका विरोधात विधी अधिकाºयांनी पोलीसांत गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही महिन्यापासून असे प्रकार पालिकेच्या विविध प्रभागात झाल्याने कामगारांमध्ये भिती निर्माण झाली आहे.
महानगरपालिका प्रभाग समिती कार्यालय क्र. ५ मध्ये काम करणारा लिपीक आकाश बाळाराम भोईर याने माहे एप्रिल २०१८ ते नोव्हेंबर २०१८ दरम्यान मंजूर देयकानुसौर कामगारांना वेतन न करता सदर रक्कमेचा संगणक डाटामध्ये फेरफार केला. त्याच प्रमाणे स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी १ लाख १० हजार ८७९ रूपये स्वत:च्या खात्यात जमा करून घेऊन या रक्कमेचा अपहार केल्याचे आढळून आले. त्याने महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान करून फसवणऊक केल्या प्रकरणी मनपाचे विधी अधिकारी अनिल प्रधान यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात आकाश बळीराम भोईर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या महिन्यात आस्थापना विभागात काम करणाºया दोन कर्मचा-यांनी महानगरपालिकेच्या कामगारांच्या वेतनपत्रकात फेरफार करून सुमारे दिड लाख रूपयांचा अपहार करून पालिकेचे व कामगारांचे आर्थिक नुकसान केले. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर सहा महिन्यापुर्वी प्रभाग समिती क्र. ४ मध्ये सुध्दा संगणाकांत फेरफार करून नागरिकांनी भरलेल्या कराच्या रक्कमेचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे महानगरपालिकेच्या १ ते ५ प्रभााग समिती कार्यालयांत मालमत्ता कराचा कपशील असलेल्या संगणकाचे सखोल तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.