प्रवाशाला लुटणारी दुक्कल गजाआड; पोलिसांची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 01:02 AM2020-01-05T01:02:43+5:302020-01-05T01:02:47+5:30
उत्तर प्रदेश, गोरखपूर येथे जाणाऱ्या शाहू हरिराम यादव (२०) या प्रवाशाला कन्फर्म तिकीट काढून देण्याच्या बहाण्याने लुटणा-या बिहारमधील मोहम्मद आबिद नदाफ (२९) आणि मोहम्मद नदीम मन्सुरी (२०) यांना ठाणे लोहमार्ग पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
ठाणे : उत्तर प्रदेश, गोरखपूर येथे जाणाऱ्या शाहू हरिराम यादव (२०) या प्रवाशाला कन्फर्म तिकीट काढून देण्याच्या बहाण्याने लुटणा-या बिहारमधील मोहम्मद आबिद नदाफ (२९) आणि मोहम्मद नदीम मन्सुरी (२०) यांना ठाणे लोहमार्ग पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
ठाणे स्थानकातील फलाट क्र मांक ७ वरून उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे जाणाºया पवन एक्स्प्रेसने यादव हे शुक्र वारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास आले होते. यादव यांच्याकडे जनरल डब्याचे तिकीट होते. दरम्यान, अटकेतील दुकलीने यादव यांना आपले भाऊजी तिकीट तपासनीस असून कन्फर्म तिकीट काढून देण्याची बतावणी केली. त्यासाठी यादव यांच्याकडून दोन हजार रु पये घेऊन नदाफ तिकीट काढण्यासाठी त्याला घेऊन जाऊ लागला. तेव्हा यादव यांच्याकडील बॅग मन्सुरी यांच्याकडे ठेवली. काही अंतर जाताच मन्सुरी ती घेऊन रेल्वेमार्गातून पळून जाऊ लागल्याने यादवला संशय आल्याने त्याने नदाफ याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर, पोलिसांनी काही वेळातच मन्सुरी याला बॅगेसह शोधून काढले. पुढील तपास ठाणे लोहमार्ग पोलीस करीत आहेत.