अमेरिकन डॉलर्स एक्सचेंज करण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करणाऱ्या दुकलीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 11:50 PM2020-11-04T23:50:16+5:302020-11-04T23:55:31+5:30

बनावट अमेरिकन डॉलर्सच्या बदल्यामध्ये भारतीय चलन घेऊन नागरिकांची दोन लाखांची फसवणूक करणा-या सफिउला शेख (२५) आणि याकूब शेख ( २२) या दोघांना डायघर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून अमेरिकन चलनातील १०१ डॉलर्सच्या नोटा आणि तीन मोबाईल असा मुद्देमालही जप्त केला आहे.

Dukli arrested for defrauding millions in the name of exchanging US dollars | अमेरिकन डॉलर्स एक्सचेंज करण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करणाऱ्या दुकलीला अटक

१०१ डॉलर्सच्या अमेरिकन चलनी नोटाही हस्तगत

Next
ठळक मुद्देडायघर पोलिसांची कारवाई १०१ डॉलर्सच्या अमेरिकन चलनी नोटाही हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: बनावट अमेरिकन डॉलर्सच्या बदल्यामध्ये भारतीय चलन घेऊन नागरिकांची दोन लाखांची फसवणूक करणाºया सफिउला शेख (२५) आणि याकूब अलिहुसेन शेख ( २२) या दोघांना डायघर पोलिसांनी अटक केल्याची माहिती कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल घोसाळकर यांनी बुधवारी दिली. या आरोपींकडून २० डॉलर्स चलनाच्या ५ आणि एक डॉलर्स एक नोट आणि तीन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
नवी मुंबईच्या वाशी येथील श्रीनाथ सोनाथ हे खासगी प्रवासी मोटारकार चालक आहेत. सप्टेंबर २०२० मध्ये त्यांच्या कारमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने अमेरिकन डॉलर्सची माहिती त्यांना दिली. त्यांची मावशी एका महिलेच्या घरी केअरटेकरचे काम करायची. ती महिला मृत झाल्यावर त्या महिलेच्या सामानात मावशीला अमेरीकन डॉलर्स मिळाले आहेत. हे अमेरीकन डॉलर्स भारतीय चलनात बदलून हवे असल्याचे सांगितले. पैशाच्या प्रलोभनामुळे श्रीनाथ हे त्या अनोळखीच्या सांगण्यावरु न ४ सप्टेंबर रोजी कल्याणफाटा येथे दोन लाख रुपये भारतीय चलनाच्या नोटा घेऊन गेले. या दोन भामटयांनी त्यांच्या अन्य दोन साथीदारांना पाठवून श्रीनाथ यांच्याकडील रोख रक्कम घेत त्यांच्या हातात वर्तमानपत्रांचे नोटांच्या आकाराचे बंडल देत त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी शीळ डायघर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्याचा तपास सुरु असताना शिळफाटा येथे दोघेजण अमेरीकन डॉलर्स बदलण्यासाठी विचारणा करीत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रदीप सरफरे यांना मिळाली. त्याच अनुषंगाने वरीष्ठ पोलीस निरिक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक सरफरे आणि भूषण कापडणीस आदींच्या पथकाने शीळफाटा येथे छापा मारुन ३१ आॅक्टोबर रोजी सफिउलासह दोघांना अटक केली. त्यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने हा फसवणूकीचा प्रकार केल्याची कबूली दिली. न्यायालयाने या दोघांनाही ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्याकडून फसवणूकीतील २३ हजार ५०० रुपये जप्त केले आहे. यात आणखी सात आरोपींचा समावेश असून मुळचे ते झारखंड आणि पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहेत. प्रत्येक कामासाठी स्वतंत्र मोबाईलचा ते वापर करीत असून त्यांच्या वेगवेगळ्या टोळया पूर्ण राज्यात अशा प्रकारे फसवणूक करीत असल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या साथीदारांनी ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई परिसरात अनेकांची फसवणूक केल्याची कबूली दिली.
* अमेरिकन डॉलर्स स्वस्त दरामध्ये एक्सचेंज करुन देतो, असे सांगून फसवणूक करणाºया भामटयांपासून सतर्क राहण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी केले आहे.

Web Title: Dukli arrested for defrauding millions in the name of exchanging US dollars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.