वाहनांची विक्री करुन देण्याचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या दुकलीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 01:41 AM2021-09-06T01:41:24+5:302021-09-06T01:43:48+5:30

वाहनांची विक्री करुन देण्याचे अमिष दाखवून ती परस्पर दुसºयालाच कोणतेही कागदपत्रे न बनविताच फसवणूक करणाºया टोळीस ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने नुकतीच अटक केली आहे.

Duklis arrested for trying to sell vehicles | वाहनांची विक्री करुन देण्याचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या दुकलीस अटक

ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

Next
ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाईतीन वाहने हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: वाहनांची विक्री करुन देण्याचे अमिष दाखवून ती परस्पर दुसºयालाच कोणतेही कागदपत्रे न बनविताच फसवणूक करणाºया टोळीस ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून एका मर्सिडीज मोटारकारसह तीन वाहने जप्त केली आहेत.
डोेंबिवतील मानपाडा पोलीस ठाण्यात ४ डिसेंबर २०१९ रोजी असाच प्रकारे फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला होता. यातील एक इनोव्हा क्रिस्टा कार ही तक्रारदाराला विश्वासात घेऊन दुसºयाच गिºहाईकाला विक्री करुन देतो, अशी बतावणी करुन परस्पर तिची दुसºयाच पार्टीला विक्री करुन कमलेश जाधव नावाच्या व्यक्तीने फसवणूक केल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांना मिळाली होती. त्याच आधारे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे आणि उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होनराव, सहायक पोलीस निरीक्षक अशोक शेंडगे आणि हवालदार संदीप शिर्के आदींच्या पथकाने कमलेश जाधव याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याला २२ आॅगस्ट रोजी अटक करण्यात आली. ठाणे न्यायालयाने त्याला ३० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. आता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. यातील कार ही रायगड जिल्यातील करंजडे (ता. पनवेल) येथे राहणाºयास १३ लाख रुपयांमये विक्री केली होती. ही कार त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली. त्याच्याकडे केलेल्या कौशल्यपूर्ण चौकशीमध्ये त्याने त्याचा साथीदार वसीम कुरेशी याच्यासह अशा प्रकारे ११ मोटार कारची मुळ मालक आणि दुसºया पार्टीला विक्री केलेल्या व्यक्तींची फसवणूक केल्याचेही उघड झाले. यामध्ये एका मर्सिडीज कारचाही समावेश आहे. यातील एका मर्सिडीजसह तीन मोटारकार जप्त केल्या आहेत. याप्रकरणी मानपाडा, मुंबईतील चेंबूर आणि पालघरमधील विरार पोलीस ठाण्यात अपहारासह फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे.उर्वरित आठ वाहनांच्या मुळ मालकांचा तसेच ज्यांना विक्री केली आहेत, त्या कार चालकांचा शोध घेतला जात आहे. सहायक पोलीस निरीक्षक अशोक शेंडगे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Duklis arrested for trying to sell vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.