मुरबाड तालुक्यात बिबट्याची कातडी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:38 AM2018-04-19T01:38:34+5:302018-04-19T01:38:34+5:30
वनकर्मचाºयांनी सोंगाळ याच्याकडे बोगस ग्राहक पाठवून व्यवहार केला.
मुरबाड : मुरबाड तालुक्यातील वाघवाडी (पळू) येथील एकाला बिबट्याच्या कातडीसह अटक करण्यात आली आहे. टोकावडे उत्तर आणि टोकावडे दक्षिण वनपरिक्षेत्राचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी सयुक्तपणे ही कारवाई केली. आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मोतीराम गोविंद सोंगाळ (रा. वाघवाडी, पळू) याच्याजवळ बिबट्याची कातडी असल्याची माहिती टोकावडे वनपरिक्षेत्राच्या कर्मचाºयांना मिळाली. त्यांनी चौकशीस सुरु केली. पण मोतीराम थांग लागू देत नव्हता. शेवटी, वनकर्मचाºयांनी सोंगाळ याच्याकडे बोगस ग्राहक पाठवून व्यवहार केला. त्याने आधी दोन लाख मागितले. शेवटी, व्यवहार लाखात ठरला. बोगस गिºहाईक बनलेल्या वनकर्मचाºयाने सोंगाळ याला विद्यानगर येथे येण्यास सांगितले. त्यानुसार, तो आला आणि गिºहाइकांना बॅगमध्ये ठेवलेली कातडी दाखवत असताना गिºहाइकांनी ओळख उघड करत त्याला बिबट्याच्या कातडीसह अटक केली.
साध्या वेशातील कर्मचारी
सुगावा लागताच आरोपी पळून जाऊ नये, म्हणून आजूबाजूला साध्या वेशातील गुप्त वनकर्मचारी तैनात करण्यात आले होते. आरोपीला नंतर मुरबाड न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.