अस्वच्छता करणाऱ्यांना दणका, वर्षभरात ५२ हजार नागरिकांकडून एक कोटींचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 03:56 AM2019-02-03T03:56:56+5:302019-02-03T03:57:10+5:30

शहर अस्वच्छ करणा-यांकडून सफाईमार्शलच्या माध्यमातून मागील वर्षभरात जवळपास एक कोटी रु पयांचा दंड वसूल केला आहे. कचरा टाकणे आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाºया ५२ हजारांवर नागरिकांकडून तो वसूल केला आहे.

Dump to the detergent, the recovery of one crore rupees from 52,000 citizens in a year | अस्वच्छता करणाऱ्यांना दणका, वर्षभरात ५२ हजार नागरिकांकडून एक कोटींचा दंड वसूल

अस्वच्छता करणाऱ्यांना दणका, वर्षभरात ५२ हजार नागरिकांकडून एक कोटींचा दंड वसूल

Next

ठाणे - शहर अस्वच्छ करणाºयांकडून सफाईमार्शलच्या माध्यमातून मागील वर्षभरात जवळपास एक कोटी रु पयांचा दंड वसूल केला आहे. कचरा टाकणे आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाºया ५२ हजारांवर नागरिकांकडून तो वसूल केला आहे.

गेल्या वर्षभरात दंडवसुलीला वेग आला आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे त्यास गती नव्हती. सफाईमार्शलने आता कडक धोरण अवलंबून अस्वच्छता पसरवणाºयांवर करडी नजर ठेवली आहे. प्रत्येक ठिकाणी ५० ते ६० लोकांना पकडण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात मात्र १० ते १२ नागरिकच दंड भरत असल्याचे चित्र होते. काही नागरिक तर थेट राजकीय नेत्यांची नावे सांगून दंड भरण्यास नकार देत आहेत. मात्र, आता दंडवसुलीचे धोरण अधिक केल्याने वसुलीत वाढ झाली आहे.

उघड्यावर शौचास बसणे, कचरा टाकणे, रस्त्यात थुंकणे अशा प्रकारे शहर अस्वच्छ करणाºयांवर २४५ सफाईमार्शलनी ही कारवाई केली. रेल्वेस्टेशन परिसर, बस डेपो, मार्केट येथे त्यांना तैनात केले आहे. वर्षभरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणारे २७ हजार, थुंकणारे २२ हजार, तर इमारतींचे बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणाºया १५ हजार नागरिकांकडून हा दंड वसूल केला आहे.

अशी आहे दंडाची रक्कम

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे २०० रु पये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे १००, सार्वजनिक ठिकाणी अंघोळ करणे १००, मूत्रविसर्जन १५०, प्राणी व पक्ष्यांना खाद्य भरवणे ५००, रस्त्याच्या कडेला शौचास बसणे १५०, व्यावसायिक वाहनांना रस्त्याच्या कडेला धुणे १०००, रस्त्याच्या कडेला कपडे व भांडी धुणे १००, अस्वच्छ परिसर आणि आवार १०,०००, इमारतीच्या पिण्याच्या पाइपलाइनमधील सांडपाण्याच्या पाइपलाइनमधील गळती आणि त्यामुळे इतरांना होणारा त्रास आणि सूचना दिल्यानंतरही १० दिवसांत दुरुस्ती न केल्यास १०,००० रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे.

डोंबिवलीत स्वच्छता मोहीम
डोंबिवली : अस्तित्व अपंग शाळा आणि केडीएमसी यांच्यातर्फे पूर्वेतील शेलारनाका, त्रिमूर्तीनगर झोपडपट्टीत शनिवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शाळेच्या सचिव राधिका गुप्ते यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला. स्वच्छता अभियानाचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर विजय घोडेकर हे उपस्थित होते.

Web Title: Dump to the detergent, the recovery of one crore rupees from 52,000 citizens in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.