मुंब्रा येथे आगीत डंपर जळाला; मध्यरात्रीची घटना, कुणीही जखमी नाही
By कुमार बडदे | Published: April 30, 2024 08:31 AM2024-04-30T08:31:35+5:302024-04-30T08:32:58+5:30
सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली
मुंब्राः माती घेऊन चाललेल्या डंपरला लागलेल्या आगीत डंपर जळाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री मुंब्रा शहरा जवळील शिळ-म्हापे रस्त्यावर घडली. जगदिश यांच्या मालकीच्या तसेच जावेद शेख हे चालवत असलेल्या डंपर मधून २५ टन माती म्हापे येथून दिवा शहरात घेऊन चाललेला डंपर शिळ -म्हापे रस्त्यावरून जात असताना मंगळवारी मध्यरात्री दोन वाजून २० मिनिटांच्या सुमारास डंपरला आग लागली. यामुळे रस्त्यावर काही काळ खळबळ उडाली होती.
स्थानिकांनी याबाबतची माहिती ठामपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या शिळ अग्निशमन केंद्रातील जवानांनी एक फायर वाहनाच्या मदतीने मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास आग विझवली. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली. या घटनेत डंपरचे पुढचे दोन्ही टायर आणि दर्शनी भाग पूर्णपणे जळाला असून,आग नियंत्रणात आणण्याच्या दरम्यानच्या काळात काही वेळेसाठी या रस्त्या वरुन होणारी वाहनांची वाहतूक विरुद्ध दिशेच्या रस्त्यावरून वळवण्यात आली होती. तसेच डंपरला लागलेली आग शाँर्टसर्किटमुळे लागल्याची माहिती शिळ अग्निशमन केंद्राचे स्थानक प्रमुख पी.डी.पाटील यांनी लोकमतला दिली.