दिव्यातील अपयश झाकण्यासाठी १४ गावातील भंडार्ली येथे डंपिंग ग्राऊंड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 03:25 PM2021-09-23T15:25:06+5:302021-09-23T15:25:31+5:30

मनसे आमदार राजू पाटील यांचा आरोप.

Dumping ground at Bhandarli in 14 villages to cover failure in diva | दिव्यातील अपयश झाकण्यासाठी १४ गावातील भंडार्ली येथे डंपिंग ग्राऊंड

दिव्यातील अपयश झाकण्यासाठी १४ गावातील भंडार्ली येथे डंपिंग ग्राऊंड

Next
ठळक मुद्देमनसे आमदार राजू पाटील यांचा आरोप

कल्याण-दिव्यातील कचरा डंपिंग ग्राऊंड बंद करण्यात यावे ही मागणी अनेक वर्षापासून आहे. मात्र हे डंपिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी ते १४ गावातील भंडार्ली गावानजीक उभारण्याचा घाट ठाणे महापालिकेने घातला आहे. दिव्यातील अपयश झाकण्यासाठी भंडार्ली येथे डंपिंग ग्राऊंड केले जात असल्याचा आरोप मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.

कचऱ्याचे आंदोलन अधिक आक्रमक होईल. भंडार्ली गावात डंपिंग आणले तर अधिकारी आणि नेत्यांना कच:यात टाकू. नागरीकांच्या सहनशक्तीचा अंत झाला आहे. वारंवार केसेस करण्याची धमकी दाखवून डंपिंग लादले जात असेल तर आमच्यावर केसस झाल्या तरी चालतील मात्र डंपिंग होऊ देणार नाही, असा सज्जड इशारा मनसे आमदार पाटील यांनी दिला.

ठाणे महापालिका हद्दीतील कचरा १४ गावातील भंडार्ली गावात टाकण्यासाठी चार हेक्टर जागा भाडे तत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला भंडार्ली ग्रामस्थांसह १४ गाव संघर्ष समितीने विरोध केला आहे. १४ गावात आधीच प्रदूषणाची समस्या आहे. ठाणे महापालिका जबरदस्तीने शहरातील कचरा गावातील नागरीकांच्या माथी मारुन त्यांचे आरोग्य धोक्यात आणत असल्याची बाब संघर्ष समितीने नमूद केली आहे. बुधवारी १४ गाव संघर्ष समिती समितीची बैठक पार पडली. या बैठकीस आमदार पाटील हे उपस्थित होते. आमदारांनी डंपिंगला विरोध करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. निवडणूक डोळ्य़ासमोर ठेवून राजकारण केले जात आहे. यावेळी आमदार पाटील यांनी भंगार माफियांनाही दम भरला आहे. सत्ताधाऱ्यांना कचऱ्यातून निवडणूकीचा फंड जमा करायचा आहे का असा सवालही उपस्थित केला आहे.

१०० एकर जागा महापालिकेनं घेतली
मलंग गड हा सह्याद्रीच्या फूटहिल्स समजला जातो. या फूटहिल्सपासूनच सह्याद्रीच्या पर्वत रांगांची सुरुवात होते. मलंग गडाच्या पायथ्याशी करवले गावात मुंबई महापालिकेने १०० एकर जागा घेतली आहे. त्याठिकाणी डंपिंग ग्राऊंड कचरा प्रकल्प तयार केला जाणार आहे. करवले गावा शेजारी असलेल्या उसाटणे गावानजीक १० हेक्टर जागेवर कचरा प्रकल्प उभारण्यासाठी उल्हासनगर महापालिका प्रयत्नशील आहे. करवले आणि उसाटणे गावातील दोन्ही डंपिंग ग्राऊंडला विरोध असताना आत्ता ठाणे महापालिका हद्दीतील कचरा भंडार्ली गावातील नागरीकांच्या माथी मारुन त्यांचे आरोग्य धोक्यात आणले जात आहे. एकूण निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या गावात डंपिंग तयार करुन गावे बकाल आणि प्रदूषित करण्याचा घाट घातला जात असल्याने त्याला विरोध केला जाईल अशी या गावातील नागरीकांची भूमिका आहे.

Web Title: Dumping ground at Bhandarli in 14 villages to cover failure in diva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.