डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न ऐरणीवर; उल्हासनगरात ऐन दिवाळी तोंडावर आली असतानाच कचऱ्याचे ढीग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 08:30 PM2021-10-19T20:30:54+5:302021-10-19T20:31:14+5:30
ऐन दिवाळी तोंडावर आली असतानाच कचरा उचलण्यासाठी महापालिकेला मोठ्या अडथळ्यांना पार करावे लागत आहे. अशीच परिस्थिती दिवाळी सणादरम्यान राहिल्यास, शहरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
सदानंद नाईक -
उल्हासनगर : खडी खदान येथील डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लो झाल्याने, कचऱ्याची गाडी खाली करण्यास जास्तीचा वेळ जात आहे. तसेच ऐन दिवाळी तोंडावर आली असतानाही नियमित कचरा उचलला जात नसल्याने, कचरा कुंड्या ओव्हरप्लो होऊन दुर्गंधी पसरली आहे. याबाबत उपायुक्त सुभाष जाधव व मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
उल्हासनगरातील कचरा नियमित उचलला जात नसल्याने, कचऱ्याच्या कुंड्या ओव्हरफ्लो होऊन दुर्गंधी पसरली आहे. गेल्या आठवड्यात आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ सुभाष जाधव यांनी मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांच्यासह स्थानिक आरोग्य निरीक्षक, मुकादम यांच्या सोबत काही भागाची पाहणी केली. यावेळी ओव्हरफ्लो झालेल्या कचरा कुंड्यां बाबत जाब विचारून कारवाई करण्याचे संकेत दिले होते. दरम्यान कॅम्प नं-५ येथील खडी खदान डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लो होत असून डम्पिंग पायथ्याशी चिखल निर्माण झाला आहे. कचऱ्याच्या गाड्या, डंपर खाली करण्यास कामगारांना जास्तीचा वेळ लागत आहे. याचा परिणाम कचरा नियमित व वेळेवर उचलला जात नसल्याने, कचरा कुंड्या ओव्हरफ्लो झाल्याचे चित्र शहरात निर्माण झाले आहे.
डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न ऐरणीवर; उल्हासनगरात ऐन दिवाळी तोंडावर आली असतानाच कचऱ्याचे ढीग...
— Lokmat (@MiLOKMAT) October 19, 2021
सदानंद नाईक - pic.twitter.com/HeAYkmd0sf
ऐन दिवाळी तोंडावर आली असतानाच कचरा उचलण्यासाठी महापालिकेला मोठ्या अडथळ्यांना पार करावे लागत आहे. अशीच परिस्थिती दिवाळी सणादरम्यान राहिल्यास, शहरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. गायकवाड पाडा परिसरातील डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचे सफाटिकरण करणे गरजेचे झाले असून महापालिका निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे उपशहरप्रमुख व लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी महापालिकेच्या धोरणावर टीका करून डम्पिंग वरील कचऱ्याचे सपाटीकरण करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तसेच महापालिकेने वेळीच निर्णय घेतला नाही तर, शहरावर कचऱ्याचे मोठे संकट उभे राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.