डंपिंगला आग लागण्याचे सत्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 05:15 PM2018-03-07T17:15:46+5:302018-03-07T17:15:46+5:30
कल्याण: उन्हाळयाला प्रारंभ होताच येथिल आधारवाडी-वाडेघर डंपिंगला आग लागण्यास सुरूवात झाली असून मंगळवारी रात्री १० च्या सुमारास आग लागल्याने आजुबाजुच्या परिसरात धुराचे लोट पसरले होते. दुर्गाडी खाडी लगतच्या डंपिंगच्या मागील वाडेघर परिसराच्या बाजुस ही आग लागली होती. अग्नीशमन दलाचे बंब आणि पाण्याचे टँकर अशा ५० ते ६० गाडयांमधील पाणी आग विझविण्यासाठी वापरण्यात आले. बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. पश्चिमेकडील आधारवाडी डंपिंगची क्षमता संपुष्टात आल्यानंतरही याठिकाणी कचरा टाकणे सुरूच आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे एकिकडे ओव्हरफ्लो होत असलेल्या या डंपिंगच्या दुर्गंधीने परिसरातील रहिवाशी हैराण झाले असताना त्यातच उन्हाळयात कचरा पेटण्याचे सत्र सुरूच असल्याचे पुन्हा एकदा मंगळवारी समोर आले.

२०१६-१७ मध्येही मोठया प्रमाणावर डंपिंगला आगी लागल्या होत्या. परंतू प्रशासनाने आजतागायत यासंदर्भात ठोस उपाययोजना न केल्याने २०१८ च्या उन्हाळयातही हे सत्र कायम राहण्याची चिन्हे आहेत. आग लागताच मोठया प्रमाणावर वाहणा-या वा-यामुळे आगीचा धूर वा-याच्या प्रवाहा बरोबरच सभोवतालच्या परिसरात पसरतो आणि तेथील रहिवाशांना श्वास गुदमरणे, खोकला येणे, मळमळणे आदि त्रासाला सामोरे जावे लागते. आगीचे प्रमाण अधिक असेल तर धूराचे लोट आधारवाडी परिसराबरोबरच वाडेघर, खडकपाडा, लालचौकी, शिवाजी चौक, गौरीपाडा, पौर्णिमा चौकी पर्यंत पसरत जातात. उन्हाळयात कच-याला आगी लागण्याच्या घटना वारंवार घडतात. उन्हात कचरा तापतो त्यात कच-यामुळे निर्माण होणारा मिथेन वायु पेट घेतो यामुळे आगी लागण्याच्या घटना घडतात. यावर उपाय म्हणुन पाण्याच्या पाईप लाईन डंपिंगमध्ये टाक ण्याबाबतची निविदा प्रक्रियाही पार पडली होती परंतू एका वरीष्ठ अधिका-याच्या हितसंबंधामुळे ती प्रक्रिया पुढे सरकू शकली नाही अशी सुत्रांची माहीती आहे. दरम्यान उन्हाळयाला प्रारंभ होताच आग लागण्याच्या घटना सुरू झाल्याने हा उन्हाळा डंपिंगच्या आजुबाजुल्या राहणा-या रहिवाशांसाठी त्रासदायक जाणार आहे. मंगळवारी साधारण रात्री १० च्या सुमारास आग लागली. याची माहीती मिळताच समोरच केंद्र असलेल्या अग्नीशामक दलाच्या गाडया घटनास्थळी रवाना झाल्या. परंतू खाडी किनारी सुटलेल्या वा-यामुळे ही आग पसरत गेली. आगीने रौद्र रूप धारण करताच आधारवाडीसह कोळसेवाडी ड प्रभागातील अग्नीशामक दलाच्या गाडया पाचारण करण्यात आल्या. सकाळी सातच्या सुमारास आगीवर काहीप्रमाणात नियंत्रण मिळविणे शक्य झाले परंतू आग ही डंपिंगच्या आतमध्ये खोलवर गेल्याने ती आतल्याआत धुमसत होती तर त्यातून धुराचे लोट बाहेर पडणे सुरूच होते. अखेर दुपारी १२ च्या सुमारास या आगीवर संपुर्णपणे नियंत्रण मिळविण्यात यश आले अशी माहीती आधारवाडी केंद्राचे उपस्थानक अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.