ठाण्यातून रिक्षाचे टायर चोरणाऱ्या दुकलीला अटक: ५ गुन्हे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 10:14 PM2018-07-10T22:14:13+5:302018-07-10T22:23:41+5:30

ठाण्याच्या निर्जन भागात उभ्या असलेल्या रिक्षाचे टायर भल्या पहाटे चोरी करणाºया सलमान बर्डी आणि तन्वीर सिद्धीकी या भिवंडीतील दुकलीला चितळसर पोलिसांनी अटक केली आहे. रिक्षासह १३ टायरही त्यांच्याकडून जप्त केले आहेत.

Duo arrested from Thane, Rickshaw tires theft: 5 crime detect | ठाण्यातून रिक्षाचे टायर चोरणाऱ्या दुकलीला अटक: ५ गुन्हे उघड

रिक्षासह एक लाख १५ हजारांचा ऐवज हस्तगत

Next
ठळक मुद्देभिवंडीतून ठाण्यात रिक्षाने चोरीसाठी यायचेरिक्षासह एक लाख १५ हजारांचा ऐवज हस्तगतचितळसर पोलिसांची कारवाई

ठाणे : ठाण्यातील ठराविक ठिकाणी पार्र्किंग केलेल्या रिक्षांचे टायर चोरणा-या सलमान बर्डी (२६) आणि तन्वीर आलाम सिद्धीकी (२१, रा. दोघेही निजामपुरा, भिवंडी, ठाणे) दोघांना चितळसर पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. त्यांच्याकडून एका रिक्षासह एक लाख १५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
ठाण्याच्या वसंतविहार आणि गावंडबाग परिसरात उभ्या असलेल्या रिक्षांचे टायर गेल्या दोन महिन्यांपासून चोरीस जात होते. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात पाच ते सहा वेगवेगळे गुन्हेही दाखल झाले होते. सहायक पोलीस निरीक्षक प्रविण बनगोसावी, जमादार तुकराम बांगर, नाईक राजाराम जाधव आणि कॉन्स्टेबल मिलींअ देसले यांचे पथक रविवारी रात्रीच्या सुमारास गस्त घालीत असतांना त्यांना माजीवडा परिसरात सलमान हा रिक्षा चालक आणि त्याचा साथीदार तन्वीर हे दोघेही संशयास्पदरित्या फिरतांना आढळले. पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना अधिक ‘बोलते’ केल्यानंतर सलमानच्या रिक्षातून हे दोघेही अधूनमधून पहाटे १ ते ५ वाजण्याच्या सुमारास निर्जनस्थळी उभ्या असलेल्या रिक्षांचे टायर चोरी करीत असल्याची त्यांनी कबूली दिली. त्यांनी वसंतविहार परिसरातून दोन तर गावंडबाग भागातून तीन रिक्षांच्या टायरची चोरी केल्याचेही चौकशीत सांगितले. रात्री उभी केलेल्या रिक्षाचे सकाळी टायर गायब होण्याच्या घटनांमुळे रिक्षा चालकही हैराण झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बनगोसावी यांच्या पथकाने भिवंडीतील निजामपूरा येथील सलमानच्या घरातून रिक्षाचे १३ टायर तसेच चोरीसाठी वापरलेली रिक्षा असा एक लाख १५ हजारांचा ऐवज त्यांनी हस्तगत केला. घरात जमा केलेले हे टायर ते विक्री करण्याच्या बेतात असतांनाच पोलिसांनी त्यांची धरपकड केल्यामुळे त्यांच्याकडून हे पाचही गुन्हे उघडकीस आले. त्यांची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Web Title: Duo arrested from Thane, Rickshaw tires theft: 5 crime detect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.