ठाण्यात मोबाइल चोरणाऱ्या दुकलीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 10:24 PM2019-02-27T22:24:25+5:302019-02-27T22:58:10+5:30

ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात मोटारसायकलीवरुन येऊन पायी जाणाऱ्यांच्या हातातील मोबाईल जबरीने हिसकावून पळ काढणा-या एका दुकलीला वागळे इस्टेट पोलिसांनी मोठया शिताफीने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून अडीच लाखांचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

Duo Thieves of mobile arrested by Thane Police | ठाण्यात मोबाइल चोरणाऱ्या दुकलीला अटक

वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई

Next
ठळक मुद्दे१३ मोबाइल हस्तगत मोटारसायकलवरुन येऊन जबरीने चोरी करायचे वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई

ठाणे : मोटारसायकलवरून येऊन वागळे इस्टेट, श्रीनगर आणि वर्तकनगर परिसरातील पादचाऱ्यांचे मोबाइल हिसकावून पळ काढणा-या अविराज यादव (२०, श्रीनगर, वागळे इस्टेट, ठाणे) आणि सुमित ऊर्फ गोरू भुंबक (१९, रा. वाल्मीकीपाडा, वागळे इस्टेट, ठाणे) या दोघांना वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्याकडून दोन लाख ५४ हजारांचे  १३ मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत.
मुंबई-अहमदाबाद पूर्व दु्रतगती महामार्गालगतच्या सेवारस्त्यावरून शिवबदन विश्वकर्मा (३४, रा. सावरकरनगर, ठाणे) हे २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास पायी जात होते. त्याचवेळी एका स्कूटीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांच्या हातातील सात हजारांचा मोबाइल हिसकावून पळ काढला. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. वागळे इस्टेट, श्रीनगर आणि वर्तकनगर या परिसरांमध्ये मोटारसायकलवरून येत पायी जाणाºया नागरिकांचे मोबाइल जबरीने चोरून त्यांची विक्री करून मौजमजा करणा-या दुकलीची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे २५ फेब्रुवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांचे पथक तपास करत असताना दोघेजण एका स्कूटीवरून वागळे इस्टेट, बीअर कंपनीजवळून संशयास्पदरीत्या जाताना आढळले. त्यांना बोलते केल्यानंतर अविराज आणि सुमित अशी त्यांची नावे सांगितली. त्यांनी सेवारस्त्यावरील जबरी चोरीची कबुलीही दिली. जबरी चोरीसाठी वापरलेली स्कूटीही पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केली आहे. त्यांनी वागळे इस्टेट, श्रीनगर आणि वर्तकनगर या भागांतून अशा प्रकारचे १२ मोबाइल जबरीने चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे दोन लाख ५४ हजारांचे १३ मोबाइल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांनी आणखीही गुन्हे केल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यांच्या साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Duo Thieves of mobile arrested by Thane Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.