उल्हासनगर मध्यवर्ती रूग्णालयात प्रसूती दरम्यान मायलेकीचा मुत्यू, डॉ कदम व खाडे यांच्यावर कार्यमुक्तीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2017 03:55 PM2017-10-14T15:55:25+5:302017-10-14T15:55:54+5:30

मध्यवर्ती रूग्णालयात शुक्रवारी प्रसूती दरम्यान महिला व बाळाचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.

During the childhood in Ulhasnagar Central hospital, removal proceedings against Molekee, Dr Kadam and Khade | उल्हासनगर मध्यवर्ती रूग्णालयात प्रसूती दरम्यान मायलेकीचा मुत्यू, डॉ कदम व खाडे यांच्यावर कार्यमुक्तीची कारवाई

उल्हासनगर मध्यवर्ती रूग्णालयात प्रसूती दरम्यान मायलेकीचा मुत्यू, डॉ कदम व खाडे यांच्यावर कार्यमुक्तीची कारवाई

Next

उल्हासनगर - मध्यवर्ती रूग्णालयात शुक्रवारी प्रसूती दरम्यान महिला व बाळाचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करून मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे निवेदन दिले. आरोग्य उपसंचालक डॉ रत्ना रावखंडे यांनी घडलेल्या सर्व प्रकारची चौकशी करण्याचे आदेश देवून डॉ सुहास कदम व डॉ अर्जना खाडे यांना कार्यमुक्त केले.नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह रूग्णालया समोर ठेवून आंदोलन केले.

उल्हासनगर येथील मध्यवर्ती रूग्णालयात आंबिवली गावात राहणारी आरती चौहाण हिला प्रस्तूतीसाठी नातेवाईकांनी शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता भरती केले. महिलेला उपचारासाठी येथे का आणले?. तुम्हांला कल्याण येथील शासकिय दवाखाना जवळ आहे. आदी अनेक प्रश्नाची सरबती करून महिलेवर उपचार सुरू केला. यावेळी डॉक्टर व नातेवाईकांत तू तू में में झाली. महिलेची तब्येत त्यावेळी ठणठणीत व चांगली असून नैसर्गिेक प्रसुतीसाठी काही काळ थांबण्याचा सल्ला नातेवाईकाना डॉक्टरांनी दिला. सकाळी ९ वाजता नातेवाईकांनी महिलेला चहा देवून काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगितले.

महिलेच्या प्रसूतीला वेळ होत असल्याने, नातेवाईकांनी पुढाकार घेत दुपारी नैसर्गिक प्रसुती होत नसेलतर सिजर करा. असा सल्ला डॉ सुहास कदम, डॉ अर्चना खाडे यांना दिला. मात्र त्यांनी सल्ला ऐकला नाही. थेट सायकांळचे साडे चार वाजता महिलेचे सिजर केले. सिजर मध्ये बाळाचा मुत्यू झाला असून महिलेची तब्येत ठणठणीत व चांगली असल्याचे नातेवाईकांना डॉक्टरांनी सांगितले. मात्र महिलेला भेटण्यास मनाई केली. त्यामुळे नातेवाईकांचा मनात सशंय बळावला. त्यांनी महिलेला भेटण्याची इच्छा वांरवांर डॉक्टरकडे व्यक्त केली.

अखेर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी सायकांळचे ७ वाजता मध्यवर्ती पोलिस ठाणे गाठून महिलेला डॉक्टर भेटू देत नाही. असी तक्रार केली. त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थाची भुमिका वठवित डॉक्टरांची चर्चा केली. काही काळ थांबा महिलेची तब्येत ठणठणीत असल्याचे पोलिसांनी नातेवाईकांना सांगितले. मात्र अचानक रात्री ९ वाजता महिलेची तब्येत अत्यंत खराब असून मुंबईला घेवून जावे लागेल. असे घाईघाईत सांगण्यात आले. याप्रकाराने नातेवाईकाच्या पाया खालची वाळु सरकली. रूग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ अशोक नांदापुरकर यांनी घटनेचे गांभिर्य ओळखून झालेल्या घटनेची सविस्तर माहिती आरोग्य संचालय डॉ रत्ना रावखंडे यांना दिली. तसेच मृत महिलेच्या नातेवाईकांना खाजगी शववाहिनी उपलब्ध करून दिली.

मृतदेहाचे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यासाठी रात्री २ वाजता महिलेचा मृतदेह मुंबई घेवून जे जे रूग्णालयात गाठले. शनिवारी सकाळी ६ वाजता रूग्णालयात पोहचल्यानंतर सकाळी ९ वाजता इन कॅमेरा शवविच्छेदन झाले. शवविच्छेदनानंतर मृतदेह पुन्हा मध्यवर्ती रूग्णालयात आणून डॉक्टरावरील कारवाईसाठी आंदोलन केले. घटनेचे गांभीर्य ओळखून आरोग्य संचालक डॉ रत्ना रावखंडे यांनी डॉ सुहास कदम व डॉ अंजली खाडे यांना रूग्णालयातून कार्यमुक्त करून चौकशीचे आदेश दिले. तसेच महिलेच्या नातेवाईकांना विशेष बाबत म्हणून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह व लहान बाळ घेवून निघुन गेले. असी माहिती मध्यवर्ती रूग्णालयाचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ अशोक नंदापुरकर यांनी दिली. याप्रकाराने संपूर्ण रूग्णालय परिसरात तणावाचे वातावरण होते. सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिस तैनात केले होते.

डॉ सुहास कदम यांच्या चौकशीचे आदेश
मध्यवर्ती रूग्णालयातील स्त्रीरोगतंज्ञ डॉ सुहास कदम व डॉ अर्जना खाडे यांच्यासह इतर कर्मचा-यांच्या हलगर्जीपणामुळे दोन जीवाचा बळी गेल्याचा आरोप नातेवाईकासह नागरिकांनी केला. घटनेचे गांभीर्य ओळखून मुंबई विभागाच्या आरोग्य संचालक डॉ रत्ना राखखंडे यांनी ठाणे रूग्णालयाचे जिल्हाशल्य जिकित्सक डॉ बी सी कॅम्पी पाटील यांना सदर घटना व डॉक्टरांच्या चौकशीचे आदेश दिले. तसेच डॉ खाडे व कदम यांना रूग्णालयातून कार्यमुक्त केले. 

खुनाचा गुन्हा दाखल करा
मृत महिलेच्या नातेवाईकांनी डॉ सुहास कदम व डॉ अर्चना खांडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मध्यवर्ती रूग्णालयात तसे निवेदन व तक्रार देणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसूतीसाठी हसत-खेळत आलेल्या महिलेसह तीच्या बाळाचा डॉक्टर व संबधीत कर्मचा-यांच्या हलगर्जीपणामुळे मुत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: During the childhood in Ulhasnagar Central hospital, removal proceedings against Molekee, Dr Kadam and Khade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.