संचारबंदीच्या काळात गेल्या चार दिवसात ८७३ वाहने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 05:03 PM2021-04-19T17:03:23+5:302021-04-19T17:05:45+5:30

ठाणे जिल्हयात शहरी भागासह ग्रामीण भागात झपाटयाने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरात जमावबंदी लागू केली आहे. या संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणारे आणि कोरोनाचा चाचणी अहवाल नसणारे अशी ८७३ वाहने ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने जप्त केली आहे.

During the curfew, 873 vehicles were seized in the last four days | संचारबंदीच्या काळात गेल्या चार दिवसात ८७३ वाहने जप्त

कोरोनाचे नियम तोडणाऱ्या तीन हजार ९१८ चालकांवर कारवाई

Next
ठळक मुद्देकोरोनाचे नियम तोडणाऱ्या तीन हजार ९१८ चालकांवर कारवाई वाहतूक शाखेने उगारला कारवाईचा बडगा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे जिल्हयात शहरी भागासह ग्रामीण भागात झपाटयाने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरात जमावबंदी लागू केली आहे. या संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणारे आणि कोरोनाचा चाचणी अहवाल नसणारे अशी ८७३ वाहने ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने जप्त केली आहे. त्याचबरोबर कोरोनासंबंधी नियम तोडणाºया इतर तीन हजार ९१८ वाहन चालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ठाणे जिल्ह्यातही संचारबंदी लागू केली आहे. बुधवारी लागू केलेल्या संचारबंदीच्या आदेशामध्ये सार्वजनिक वाहतूकीस परवानगी दिलेली आहे. मात्र, त्यासाठी वाहन चालकांकडे लसीकरणाचे प्रमाणपत्र किंवा कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक आहे. तरच अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना वाहन घेऊन फिरता येऊ शकते, असे आदेशात स्पष्ट केले आहे. त्यानंतरही ठाणे ते बदलापूर यादरम्यान, अनेक वाहन चालक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे आढळले आहे. ठाणे वाहतूक शाखेच्या १८ विभागांतर्गत केलेल्या नाकाबंदीमध्ये ही बाब स्पष्ट झाली. त्यामुळे शहरात विनाकारण फिरणाºया नागरिकांवर तसेच रिक्षा चालक किंवा बसमधून प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत होते. त्यानुसार १४ ते १८ एप्रिल या पाच दिवसांच्या कालावधीत ठाणे शहर वाहतूक पोलीस आयुक्तालयात वाहतूक पोलिसांनी ८७३ वाहने जप्त केली आहेत. यामध्ये सर्वाधिक ४८० दुचाकींवर जप्तीची कारवाई करण्यात आली. त्या खालोखाल २९६ रिक्षा, तर ९७ मोटारकारवर जप्तीची कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये पोलिसांकडून महत्त्वाच्या चौकांमध्ये तपासणी केली जात होती. यामध्ये सर्वाधिक कारवाई दुचाकी आणि रिक्षांवर करण्यात आली आहे.
* ठाणे आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये १४ ते १८ एप्रिल या संचारदबंदीच्या कालावधीमध्ये नियम धुडकावणाºया तब्बल तीन हजार ९१८ वाहन चालकांवर कलम १७९ नुसार कारवाई करण्यात आली. यामध्ये दुचाकीवर ट्रीपल सीट फिरणारे, वाहतूकीचे नियम मोडणाºया तसेच सीट बेल्ट न लावणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई केली आहे. यात भिवंडीमध्ये सर्वाधिक ४३७, नारपोलीमध्ये ४२६ तर कोनगावमध्ये ४१२ वाहनांवर कारवाई करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
आपल्या कुटूंबाच्या आरोग्यासाठी नागरीकांनीही महत्त्वाच्या कामाशिवाय विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहनही वाहतूक शाखेने केले आहे.

Web Title: During the curfew, 873 vehicles were seized in the last four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.