संचारबंदी काळात ठाण्यात दूध, भाजीपाला अत्यावश्यक सेवा सुरु राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 09:14 PM2020-12-22T21:14:18+5:302020-12-22T21:26:17+5:30

परदेशामध्ये कोरोना विषाणूपेक्षा ७० टक्के घातक कोरोनाचा नविन संसर्ग वेगाने फैलावत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात रात्री ११ ते सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी संचारबंदी लागू केली आहे. या कारवाईसाठी जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

During the curfew, essential services for milk and vegetables will continue in Thane | संचारबंदी काळात ठाण्यात दूध, भाजीपाला अत्यावश्यक सेवा सुरु राहणार

विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

Next
ठळक मुद्दे विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा ठाण्यात रात्री ११ ते सकाळी ६ संचारबंदीचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ब्रिटनची राजधानी लंडनसह पूर्व इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूपेक्षा ७० टक्के घातक कोरोनाचा नविन संसर्ग वेगाने फैलावत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात रात्री ११ ते सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी संचारबंदी लागू केली आहे. या काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर कलम १८८ अन्वये कारवाई केली जाणार असल्याचेही या आदेशामध्ये म्हटले आहे.
राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये २१ डिसेंबर २०२० ते ५ जानेवारी २०२१ या काळात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त फणसळकर यांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या परिमंडळांमध्येही २२ डिसेंबरच्या पहाटे १ पासून या संचारबंदीचा मनाई आदेश लागू केला आहे.
* संचारबंदीमध्ये कशावर राहणार बंदी
या काळात कोणतेही कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणे, विरंगुळयासाठी बाहेर फिरणे, सायकल, मोटारसायकल आणि मोटारकारमधून विनाकारण फेरफटका मारणाºयांवर कारवाई केली जाणार आहे. इमारत, सोसायटी तसेच इमारतीच्या गच्चीवर साजरे होणारे सार्वजनिक उपक्रम, खासगी समारंभ, क्रिडा स्पर्धा, हॉटेल आणि रिसॉर्ट आदींनाही बंदी राहणार आहे. या कालावधीमध्ये धार्मिक उत्सव किंवा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आयोजकांना संबंधित पोलीस ठाण्यांकडून विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे.
* काय सुरु राहणार:
या काळात वैद्यकीय सेवा पुरविणाºया आस्थापना, अत्यावश्यक सेवा बजावणारे, दूध, भाजीपाला यांची वाहतूक व पुरवठा करणाºया अत्यावश्यक सेवाही सुरु राहणार आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाºयांविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याचेही फणसळकर यांनी आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे.
* ठाण्यात मनाई आदेशाचे उल्लंघन करणाºयांविरुद्ध कारवाईसाठी जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: During the curfew, essential services for milk and vegetables will continue in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.