कल्याणमध्ये भर दिवसा दरोडा, रिव्हॉल्वरचा धाक दाखून रोकड व सोने लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 07:23 PM2017-11-11T19:23:38+5:302017-11-11T19:23:49+5:30

शहराच्या पश्चिम भागातील चिखले भाग परिसरातील जिजाऊ कॉलनीत सोन्याचे दागिने घडविणा-या कारागिरांकडे भर दिवसा दरोडा टाकण्याचा प्रकार घडला आहे.

During the welfare of the welfare robbery, cash and ammunition of the Revolver were robbed and gold plundered | कल्याणमध्ये भर दिवसा दरोडा, रिव्हॉल्वरचा धाक दाखून रोकड व सोने लुटले

कल्याणमध्ये भर दिवसा दरोडा, रिव्हॉल्वरचा धाक दाखून रोकड व सोने लुटले

Next

कल्याण- शहराच्या पश्चिम भागातील चिखले भाग परिसरातील जिजाऊ कॉलनीत सोन्याचे दागिने घडविणा-या कारागिरांकडे भर दिवसा दरोडा टाकण्याचा प्रकार घडला आहे. रिव्हॉल्वरचा धाक दाखून दरोडेखोरांनी दोन लाख 50 हजार रुपयांची रोकड व तीन तोळे सोने घेऊन पळ काढला आहे. 

दरोडेखोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न काही कामगार व नागरीकांनी केला असता दरोडेखोरांनी गोळया झाडण्याची धमकी देत पसार झाले आहेत. ही घटना आज दुपारी दोन वाजून 45 मिनीटांनी घडली आहे. दरोडेखोर ज्या रस्त्याने पळून गेले. त्या रस्त्यावरील काही दुकानातील सीसी टिव्हीमध्ये त्यांचे पलायन कैद झाले आहे. पोलिस या सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरु केला आहे. 

कल्याणच्या हॉटेल व्यावसायिकाकडे मागितली 25 लाखाची खंडणी
कल्याण - शहरातील हॉटेल व्यावसायिक भास्कर शेट्टी यांच्याकडे 25 लाखाची खंडणी मागण्यात आली आहे. ही खंडणी सुरेश पुजारी याने मागितल्याची तक्रार शेट्टी यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुजारीच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शेट्टी हे शहरातील मोठे हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांच्या घरी एका अज्ञात इसमाने चिठ्ठी सोडली. शेट्टी गांधीरी रोडवरील कशीश पार्कमध्ये राहतात. अज्ञात इसमाने त्यांच्या घरी सोडलेल्या चिठ्ठीत त्यात शेट्टी यांचे येणो जाणो कुठे आहे याचा पत्ता आहे. शेवटचे समजावतो. अन्यथा मुले व पत्नीसमेार गोळ्य़ा घालून ठार मारु असे चिठ्ठीत म्हटले आहे. ही चिठ्ठी इंग्रजीत आहे. अन्य एका फोनरवरुन मी सुरेश पुजारी बोलतो असे सांगून 25 लाख रुपये आणून दे अन्यथा जीवे ठार मारु अशी धमकी दिली आहे. सुरेश पुजारी असे नाव सांगणा:या व्यक्तीचे फोन नंबर हे भारतीय आहेत. त्यामुळे हा फोन लोकल नंबरवरुन आला आहे. 

रवी पुजारी हा कुख्यात गँगस्टार आहे. तो परदेशातून धमकीचे फोन करतो. रवी पुजारीच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच्याच सारखा कुप्रसिद्ध होऊ पाहणारा हा सुरेश पुजारी असून त्याने या पूर्वी उल्हासनगरातील व्यापारी व बिल्डरांना धमकाविले आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. 

Web Title: During the welfare of the welfare robbery, cash and ammunition of the Revolver were robbed and gold plundered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.