ठाण्यातील २९४ पोलीस विलगीकरणानंतर ‘ऑन ड्युटी’; ४६ अधिकाऱ्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 12:55 AM2020-05-28T00:55:20+5:302020-05-28T06:40:42+5:30

मुख्यालयातील सर्वाधिक १0२ कर्मचारी

'On duty' after 294 police separations in Thane | ठाण्यातील २९४ पोलीस विलगीकरणानंतर ‘ऑन ड्युटी’; ४६ अधिकाऱ्यांचा समावेश

ठाण्यातील २९४ पोलीस विलगीकरणानंतर ‘ऑन ड्युटी’; ४६ अधिकाऱ्यांचा समावेश

Next

ठाणे : आतापर्यंत १४ अधिकाऱ्यांसह १११ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबाधित पोलीस तसेच नागरिकांच्या संपर्कातील हायरिस्कमधील ४६ अधिकाºयांसह २४८ कर्मचारी असे २९४ पोलीस पुन्हा ड्युटीवर रुजू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनेकांनी कोरोनावर मात केल्यामुळे पोलिसांमध्ये दिलासादायक वातावरण आहे.

कोरोनाबाधित नागरिकांच्या संपर्कात आल्यामुळे पोलीस मुख्यालयासह वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमधील अधिकारी, कर्मचारी हे बाधित झाले. या कोरोनाबाधित पोलीस तसेच नागरिकांच्या संपर्कातील अनेक पोलिसांना घरात तसेच केंद्रांत विलगीकरणामध्ये राहावे लागले. त्यामुळे त्यांना काही काळ सक्तीची विश्रांती मिळाली होती. यातील बहुतांश जणांचा १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी संपल्यामुळे हे सर्वजण आता पुन्हा आपल्या कर्तव्यावर हजर झाले आहेत.

असे आहे संख्याबळ

ठाणे पोलीस मुख्यालयात एका अधिकाºयासह 103

मुंब्रा पोलीस ठाण्यात १७ अधिकाºयांसह ६९, वर्तकनगर तीन अधिकाºयांसह ३0 कर्मचारी आणि वाहतूक शाखेचे २१ असे आतापर्यंत २९४ पोलीस रुजू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आतापर्यंत १४ अधिकारी आणि ९७ कर्मचारी अशा 111 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. यात एका महिला कर्मचाºयाचा मृत्यू झाला.
सात अधिकारी आणि ४२ कर्मचारी अशा ४९ पोलिसांनी कोरोनावर मात केली. सध्या सात अधिकारी आणि

54 कर्मचारी अशा ६१ जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

पोलीस मुख्यालयात सर्वाधिक २२ त्यापाठोपाठ मुंब्रा १५ तर कळव्यात १२ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. राज्य राखीव दलासह शीघ्र कृतीदलही कळवा, मुंब्रा आणि वागळे इस्टेट भागात तैनात केल्याने पोलिसांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Web Title: 'On duty' after 294 police separations in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.