ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी डॉ. शिवाजी पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 07:25 PM2018-04-12T19:25:34+5:302018-04-12T19:25:34+5:30

 Dy. Resident of Thane District Collectorate; Shivaji Patil | ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी डॉ. शिवाजी पाटील

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी डॉ. शिवाजी पाटील

googlenewsNext
ठळक मुद्देनिवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांची बदली रायगड येथून २००२ पासून पाटील यांची प्रशासकीय कारकिर्त शासनाचा एकही पैसा खर्च न होऊ देता अतिशय कमी कालावधीत ४०० घरे बांधून लोकार्पही

ठाणे : ठाण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी डॉ. शिवाजी पाटील रु जू झाले आहे. यापूर्वी यांनी उपजिल्हाधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. वंदना सूर्यवंशी यांची बदली झाल्यामुळे पाटील यांच्यावर या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
रायगड येथून २००२ पासून पाटील यांची प्रशासकीय कारकिर्त सुरू आहे. २००५ च्या अतिवृष्टीच्या काळात महाड परिसरात मोठी हानी झाली होती तसेच दरडी कोसळल्याने माणसे आणि घरेही गाडली गेली होती. महाड येथे प्रांत अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत असताना पाटील यांनी या अभूतपूर्व अशा अस्मानी संकटात तत्परतेने मदत कार्य सुरु केले होते. एवढेच नव्हे तर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने शासनाचा एकही पैसा खर्च न होऊ देता अतिशय कमी कालावधीत ४०० घरे बांधून लोकार्पही केले होते. या वैशिष्ट्यपूर्ण कामाबध्द्ल तत्कालीन राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच मुख्य सचिव यांनी देखील त्यांचा विशेष गौरव केलेला आहे.
मुंबई उपनगर येथे चार वर्षे अतिक्र मण निष्कासन विभागाचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. तर पुढील तीन वर्षे त्यांना मुंबई उपनगर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी हे पद सांभाळावयास मिळाले. त्यानंतर पाटील यांनी कामगार मंत्री प्रकाश महेता यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी म्हणून वर्षभर जबादारी सांभाळली. २०१६ मध्ये ठाणे येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे काम पाहताना या प्रकल्पाला ठाण्यात गती देण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले आहे.

Web Title:  Dy. Resident of Thane District Collectorate; Shivaji Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.