भातसा नदीत बुडून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 06:18 AM2018-05-13T06:18:10+5:302018-05-13T06:18:10+5:30
गंगादेवस्थानजवळील स्वत:च्या फार्महाऊसवर पिकनिकसाठी गेलेल्या कुटुंबांपैकी नदीत पोहण्याचा आनंद लुटू पाहणारे चार तरु ण खडवली ये
शहापूर : गंगादेवस्थानजवळील स्वत:च्या फार्महाऊसवर पिकनिकसाठी गेलेल्या कुटुंबांपैकी नदीत पोहण्याचा आनंद लुटू पाहणारे चार तरु ण खडवली येथील भातसा नदीत बुडाले. त्यातील तिघांना शिताफीने वाचवण्यात यश आले असून एकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली. मृत विद्यार्थ्याचे नाव कौस्तुभ भगवान तारमळे (२६) असे आहे. पुणे येथे उच्च शिक्षण घेतल्यानंतर तो शिलाँग येथे वैज्ञानिक अभ्यासक्र म पूर्ण करीत होता. विशेष म्हणजे कौस्तुभ हा पट्टीचा पोहणारा होता. काही वर्षे तो याच अभ्यासक्र मानिमित्ताने कॅनडा येथेही गेला होता.
जिल्हा परिषदेच्या नडगांव गटाच्या शिवसेनेच्या सदस्या रत्नप्रभा तारमळे यांचा तो मुलगा होता. घरी उन्हाळी सुट्टीसाठी आलेल्या मावशीच्या मुलांसोबत खडवलीतील भातसा नदीत पोहण्यासाठी तो गेला होता. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडणाऱ्या मावशीच्या गौरव इसामे (२०), आदित्य कार्ले (२२), शिवम चौधरी (२०) यांना कौस्तुभने शिताफीने बाहेर काढले. शेवटच्या मावसभावाला वाचवताना कौस्तुभचा बुडून मृत्यू झाला. त्याने वाचवलेल्या तिघांना पुढील उपचारासाठी कल्याणच्या खाजगी रु ग्णालयात दाखल केले आहे, तर कौस्तुभला शहापूर उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केले, तेव्हा वैद्यकीय अधिकाºयांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या मृत्युमुळे शेई गावावर शोककळा पसरली आहे.