माथेरानच्या रस्त्यावर धावणार ई-रिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 08:42 AM2022-07-28T08:42:36+5:302022-07-28T08:43:15+5:30

चाचणी शांततेत; नागरिकांकडून स्वागत : शालेय विद्यार्थी, ज्येष्ठांना प्राधान्य

E-rickshaws will run on the roads of Matheran | माथेरानच्या रस्त्यावर धावणार ई-रिक्षा

माथेरानच्या रस्त्यावर धावणार ई-रिक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
माथेरान : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बुधवारी माथेरानमध्ये अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आणि स्थानिकांच्या साथीने शांततेत ई रिक्षाची चाचणी घेण्यात आली. यावेळी कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात आली. 

यावेळी नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे, चंद्रकांत माने, आरटीओ पनवेल, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजय कराळे, संजय पाटील, डीवायएसपी कर्जत, पीसीबी सागर किल्लेदार, आर. एस. कामत, प्रभारी पोलीस निरीक्षक शेखर लव्हे आणि ई रिक्षाचे याचिकाकर्ते सुनील शिंदे आणि नागरिक मोठ्या संख्येने ई रिक्षाच्या स्वागतासाठी दस्तुरी नाक्यावर उपस्थित होते.
चाचणीसाठी एकूण पाच कंपन्यांच्या ई रिक्षा दाखल झाल्या होत्या. सध्यातरी तीन महिने या रिक्षांचे परीक्षण घेण्यात आल्यानंतर तसा अभिप्राय संनियंत्रण समितीकडे पाठविण्यात येणार असल्याचे प्रशासक भणगे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. रिक्षांमुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. आम्ही या चाचणीच्या सुरक्षेसाठी आलो असून, चढउतार असणाऱ्या ठिकाणी रिक्षा कशा प्रकारे तग धरू शकते, याची सविस्तर माहिती वरिष्ठांना 
लवकरच देणार आहोत, असे माने यांनी सांगितले.

कामगार, रुग्णांसाठी सेवा फायदेशीर
सर्व प्रक्रियेसाठी १० वर्षांपासून अविरतपणे पाठपुरावा करून रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, उपाध्यक्ष प्रकाश सुतार आणि अन्य सदस्यांच्या सोबतीने यशस्वीरीत्या या ई रिक्षाच्या चाचणीपर्यंत मजल मारणारे याचिकाकर्ते सुनील शिंदे यांच्या प्रयत्नांना यामुळे यश आले आहे. या रिक्षांचा लाभ शालेय विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे आबालवृद्ध मंडळींना घेता येणार आहे. दूरवर राहणारे बंगल्यांचे 
माळी, कामगारांना तसेच रुग्णांना ही सेवा फायदेशीर ठरणार आहे.

Web Title: E-rickshaws will run on the roads of Matheran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.