पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2 वसई कार्यालयामध्ये " ई "भेट संवाद सुविधा कार्यान्वित !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 06:26 PM2021-04-16T18:26:00+5:302021-04-16T18:27:38+5:30
Police : कोविड 19 च्या वाढत्या संक्रमणामुळे नागरिकांनी व्हाट्सआप च्या माध्यमातून साधावा संवाद ; पोलीस आयुक्त डॉ सदानंद दाते यांचा उपक्रम !
आशिष राणे
वसई - मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तांलय हद्दीतील वसई विरारच्या पोलीस उप -आयुक्त परिमंडळ 2 मधील वसई कार्यालयामध्ये वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे आरोग्य सुरक्षितता लक्षात घेऊन नागरिकांसाठी " ई "भेट संवाद सुविधा कार्यान्वित केल्याची माहिती परिमंडळ -2 चे उप-आयुक्त संजयकुमार पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.
कोविड 19 च्या वाढत्या संक्रमणामुळे नागरिकांची काही तक्रार किंवा काही काम असल्यास सोशल मीडियाच्या व्हाट्सआपच्या माध्यमातून हा संवाद अधिकाऱ्यांशी साधावा असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. सदानंद दाते यांनी केले आहे. कोविड19 या विषाणूने नागरीक व प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले असून पोलिस विभाग हा या महामारी च्या विरुद्ध उपाय योजना राबवण्यामधील एक महत्त्वाची अग्रभागी अशी संस्था आहे.
आणि कोविड19 च्या या उपाययोजनांचा एक भाग म्हणून शासनाने अनावश्यकपणे फिरणाऱ्या लोकांकरता राज्यात संचारबंदी देखील लागू केली असून सरकारी कार्यालयातील प्रत्यक्ष भेटीस मात्र मनाई केलेली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्याकरता एक माध्यम उपलब्ध करणे गरजेचे आहे.
तसेच महाराष्ट्र शासनाने कोविड 19 या वाढत्या प्रादुर्भावाचाच्या अनुषंगाने "ब्रेक द चेन "अनव्ये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये देखील अशा प्रकारचे माध्यम सुरू करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्याचा सारासार विचार करून मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त डॉ सदानंद दाते यांनी दि 16 एप्रिल रोजी पोलीस आयुक्तालया मार्फत आदेशपत्र काढले व तशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
दरम्यान या पोलीस आयुक्तांच्या पत्रांच्या अनुषंगाने तक्रारदार यांनी पोलिस उप-आयुक्त परिमंडळ 2 वसई यांचे समक्ष भेटी ऐवजी ऑनलाइन " ई " भेटद्वारे संवाद साधावा तर यासाठी हा ऑनलाइन संवाद सोमवार ते शुक्रवार या कामकाजाच्या दिवशी दुपारी 3 ते 5 या वेळेत 8669604003 या व्हाट्सअँप द्वारे किंवा व्हिडिओ कॉल द्वारे हा संवाद साधावा तसेच काही तक्रारी संबंधीची कागदपत्रे सादर करावयाची असल्यास ती वरील नमूद केलेल्या व्हाट्सअँप क्रमांकावर पाठवावीत असे ही आवाहन वसईतील परिमंडळ 2 चे पोलिस उप आयुक्त संजय कुमार पाटील यांनी केले आहे.