शाळांमधून गोळा होणार ई-कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:11 AM2017-08-02T02:11:07+5:302017-08-02T02:11:07+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या मध्यवर्ती शहर स्वच्छता समितीच्या बैठकीत १४ आॅगस्टला कल्याण-डोंबिवली शहरातील शाळांमधून ई कचरा व प्लास्टिक अंतर्गत
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या मध्यवर्ती शहर स्वच्छता समितीच्या बैठकीत १४ आॅगस्टला कल्याण-डोंबिवली शहरातील शाळांमधून ई कचरा व प्लास्टिक अंतर्गत येणाºया वस्तू गोळा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांसह, पालक आणि सर्व शाळेतील मुख्याध्यापकांना आवाहन केले जाणार आहे. तत्पूर्वी ८ आॅगस्टला सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली जाणार आहे.
केडीएमसीने १५ जुलैपासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणण्यात आली आहे. या संदर्भात महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती शहर स्वच्छता समितीची स्थापन करण्यात आली आहे. या समितीची दुसरी बैठक सोमवारी बिर्ला महाविद्यालयात झाली. त्यात १४ आॅगस्टला केडीएमसी हद्दीतील सर्व शाळांमधून ई-कचरा व प्लास्टिक अंतर्गत येणाºया सगळ््या वस्तू जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महापालिकेचे कर्मचारी प्रत्येक शाळांमध्ये सकाळी ११ वाजता जातील आणि दुपारपर्यंत ई-कचरा व प्लास्टिक गोळा करतील.
अवघे ४५ सदस्यच उपस्थित
८ आॅगस्टला सर्व शाळांमध्ये ई-कचरा व प्लास्टिक स्वच्छता बाबतची शपथ विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. या बैठकीला बिर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेशचंद्र, उपमहापौर मोरेश्वर भोईर, उपायुक्त धनाजी तोरस्कर, भाजपा गटनेते वरुण पाटील, ‘फ’ प्रभाग समितीच्या अध्यक्षा खुशबू चौधरी, ‘ब’ प्रभाग समितीच्या अध्यक्षा मनीषा तारे, महिला-बाल कल्याण समिती सभापती वैशाली पाटील, नगरसेवक कासिफ तानकी तसेच व्हिजन डोंबिवलीचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर आदी उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे शहरस्वच्छता समिती ही १०० सदस्यांची आहे. परंतु, सोमवारच्या बैठकीला केवळ ४० ते ४५ सदस्यच उपस्थित होते.