ईगल ब्रिगेड फाउंडेशनने केले डोंबिवलीत शहर सुरक्षा अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 06:04 PM2018-05-30T18:04:50+5:302018-05-30T18:04:50+5:30

ठाणे पोलिस आयुक्त, जॉईंट सी.पी., ईस्ट रिजनचे अतिरिक्त पोलिस आयुक्त,  झोन ३ चे डीसीपी संजय शिंदे, डोंबिवलीचे ए. सी. पी. तसेच  डोंबिवलीतील चारही पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल व मे महिन्यासाठी खास शहर सुरक्षा अभियानाचे आयोजन ईगल ब्रिगेड फाउंडेशन ने केले आहे. एप्रिल व मे या सुट्टीच्या काळात घरफोडी व चोरी च्या घटना घडण्याची शक्यता असते.

Eagle Brigade Foundation organized the Banana Dombivli city security campaign | ईगल ब्रिगेड फाउंडेशनने केले डोंबिवलीत शहर सुरक्षा अभियान

पहाटे देखील बंदोबस्ताला सुरवात

Next
ठळक मुद्देसोसायट्यांमध्ये जनजागृतीपहाटे देखील बंदोबस्ताला सुरवात

डोंबिवली: ठाणे पोलिस आयुक्त, जॉईंट सी.पी., ईस्ट रिजनचे अतिरिक्त पोलिस आयुक्त,  झोन ३ चे डीसीपी संजय शिंदे, डोंबिवलीचे ए. सी. पी. तसेच  डोंबिवलीतील चारही पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल व मे महिन्यासाठी खास शहर सुरक्षा अभियानाचे आयोजन ईगल ब्रिगेड फाउंडेशन ने केले आहे. एप्रिल व मे या सुट्टीच्या काळात घरफोडी व चोरी च्या घटना घडण्याची शक्यता असते. तेव्हा अशा घटना घडू नयेत म्हणून ईगल ब्रिगेड फाउंडेशन चे सदस्य पोलिस विभागाच्या अंतर्गत होणाऱ्या नाईट पेट्रोलिंग मध्ये सहभागी झाले.  तसेच गेल्या 2 महिन्यांपासून  विविध सोसायट्यांमध्ये जाऊन लोकांमध्ये खालील महत्वाच्या मुद्द्यांवर जनजागृती करण्यात आली. 
 सेल्समन तसेच अनोळखी लोकांना घरात घेऊ नका.बाहेरगावी जात असल्याची फेसबुक, व्हॉट्स अप इत्यादी सोशल मीडियावर वाच्यता करू नका. तसा स्टेटस व फोटो टाकणे टाळा.  त्याचबरोबर सायबर क्राईम पासून सावधान राहण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनां ची माहिती देण्यात आली. कोणत्याही अफवा आणि स्कीम च्या आमिषाला बळी पडू नका. योग्य ती माहिती करून घ्या. आपल्या आजूबाजूच्या परिसरावर देखील लक्ष ठेऊन दक्ष राहण्याचे सांगण्यात आले.
त्याचबरोबर ईगल ब्रिगेडने रात्री बरोबरच सकाळी पहाटे देखील बंदोबस्ताला सुरवात केली आहे. रात्रीच्या गस्ती दरम्यान वाहनांची तपासणी, सोसायटीच्या रखवालदाराला दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. या उपक्रमाने काही प्रमाणात चोरी तसेच घरफोडीच्या घटनांना आळा बसला आहे.

Web Title: Eagle Brigade Foundation organized the Banana Dombivli city security campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.