"आधीचे उद्योगमंत्री कोणत्याच कार्यक्रमला येत नव्हते, मात्र मी सगळ्या कार्यक्रमला हजेरी लावतो’’ - उदय सामंत
By अजित मांडके | Published: November 11, 2022 03:21 PM2022-11-11T15:21:58+5:302022-11-11T15:22:28+5:30
Uday Samant : आधीचे उद्योगमंत्री कोणत्याच कार्यक्रमला येत नव्हते, मात्र मी सगळ्या कार्यक्रमला हजेरी लावतो, असं विधान राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.
- अजित मांडके
ठाणे - आधीचे उद्योगमंत्री कोणत्याच कार्यक्रमला येत नव्हते, मात्र मी सगळ्या कार्यक्रमला हजेरी लावतो, असं विधान राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.
ते म्हणाले की, महाराष्ट्रच्या लघुउद्योगात खूप ताकद आहे. मंत्री झाल्यानंतर ज्या खात्याचा तो मंत्री असतो त्या खात्याला राजाश्रय देण्याचा प्रयत्न करायला हवा. उद्योगांना इंसेंटिव्ह जेंव्हा आम्ही देतो तेव्हा फार मेहरबानी करत नाही. मात्र, अडीच वर्षे का तिजोरीत राहतात हे कळत नाही. उद्योग गेले म्हणून आम्ही आरडाओरडा करतो मात्र, आपल्या उद्योजगना मोठं केलं जातं नाही. वेदांता, एअरबझ प्रोजेक्ट आले पाहिजे, मात्र आपल्या महाराष्ट्रतल्या उद्योजकांना रेड कार्पेट टाकावे, अशी माझी संकल्पना आहे, असे त्यांनी सांगितले.
सिनारमस कंपनीचा प्रोजेक्ट रायगडाला होणार होता. ही कंपनी इंडोनेशियाला जात होती. कारण त्यांनी सरकारला 37 कोटी दिले होते. मात्र कॅबिनेट सब कमिटीची बैठक लावा, अशी मागणी ते करत असताना ही बैठक झाली नाही. मात्र, आम्ही तातडीने त्यांना सहकार्य करत ही बैठक लावत हा प्रोजेक्ट महाराष्ट्रत वळवला, अशी माहितीही त्यांनी दिली.
मी मंत्री आहे म्हणून माजूरडेपणा करणार नाही. तरुणाई जेंव्हा उद्योग करायला सुरुवात करते तेंव्हा उद्योग विभागाने त्याला सहकार्य केले पाहिजे त्यामुळे उद्योग विभागाने मुख्यमंत्री रोजगार योजना सुरू केली. मुख्यमंत्री रोजगार योजनेत ओबीसी, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना सुद्धा सहकार्य करणार आहोत, असे ते म्हणाले.