उत्पन्नाचे दही हंडीआधीच रिते

By admin | Published: August 20, 2016 04:47 AM2016-08-20T04:47:21+5:302016-08-20T04:47:21+5:30

सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीवर आणि बालगोेंविदाच्या सहभागावर निर्बंध आणल्याने या उत्सवाची पंढरी म्हणून ओळखली जाणाऱ्या ठाणे शहरातील

Eating curry candy is already there | उत्पन्नाचे दही हंडीआधीच रिते

उत्पन्नाचे दही हंडीआधीच रिते

Next

- स्नेहा पावसकर/ प्रज्ञा म्हात्रे,  ठाणे


ठाणे : सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीवर आणि बालगोेंविदाच्या सहभागावर निर्बंध आणल्याने या उत्सवाची पंढरी म्हणून ओळखली जाणाऱ्या ठाणे शहरातील केवळ दहीहंडी उत्सवाचे आयोजक, उत्सव मंडळाच हिरेमोड झाला नसून उत्सवाच्या काळात रोजगार मिळून चार-दोन पैसे मिळवणारे डेकोरेटर्स, डीजे चालक, सिलेब्रेटींसह सूत्रसंचालकांच्या उत्पन्नाचे दही मात्र दहीहंडी फुटण्याआधीच रिते झाले आहे.

दहीहंडी उत्सवात साऊण्ड रेण्टल कंपन्यांना चांगली मागणी असते. कोर्टाच्या निर्णयामुळे आमच्या व्यवसायावर १०० टक्के परिणाम झाला आहे. २० फुटांच्या दहीहंडीत निश्चितच ग्लॅमर, थ्रील आणि अ‍ॅडव्हेन्चर नसणार. परंतु, दहीहंडी, नवरात्रोत्सव आणि गणेशोत्सव या उत्सवांतून आम्हाला चार पैसे अधिक मिळतात आणि त्या सिझनची सुरूवात दहीहंडीपासून होते. या तिन्ही उत्सवाकडे आम्ही दिवाळी बोनस म्हणून पाहतो. परंतु, कोर्टाच्या या निर्णयामुळे आज यात काम करणाऱ्या सर्व कामगारांच्याही पोटावर पाय आला आहे. कायद्याचे आम्ही स्वागतच करतो पण आमच्याही पोटा पाण्याचा विचार होण्याची गरज आहे.

डीजेच्या ग्रुपशी संपर्क साधला असता त्यांनी अजून आम्हाला परवानगीचे पत्र मिळालेले नाही. त्यामुळे कुठे जायचे याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही असे सांगितले. दहीहंडी उत्सवात साऊण्ड् सिस्टीम लावण्याचे दर कमीत कमी १५ हजार ते जास्तीत जास्त चार लाखांपर्यंत असतात.

काही आयोजक हे कायद्याच्या चौकटीत राहून हा उत्सव साजरा करणार आहेत तर काही आयोजकांनी या अटींमुळे हा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमचे नुकसानच आहे. दिलेल्या डेसिबलच्या मर्यादेमध्येही आम्हाला काम करणे शक्य नाही. आज आम्ही साऊण्डस साठी कर्ज घेतले आहेत. हे कर्ज कसे फेडणार हा मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा राहीला आहे. शेतकऱ्यांप्रमाणे आमच्यावरही आत्महत्त्येची वेळ येणार आहे. ठाणे जिल्ह्यात जवळपास दीड हजारांहून अधिक साऊण्ड रेण्टल कंपनी आहे आणि यावर दीड ते दोन लाख लोक अवलंबून आहे. प्रत्येक कंपनीला दहीहंडी उत्सवात ३० ते ५० हजारांचे नुकसान आहे.
- राजीव नायडू, सेक्रेटरी, पाला संघटना
(प्रोफेशनल आॅडीओ लायटींग असोसिएशन)

दहीहंडीच्या आधी २ दिवस किंवा मग १ रात्र आधीपासून हंडी उत्सवाच्या जागी आम्ही लाईट, मंडप उभारणीचे काम करतो. परंतु छोटे स्टेज, मंडप, डीजे, लाईटस् याचे बजेट साधारण ४० हजारापर्यंत जाते. मंडप त्यापेक्षा थोडा मोठा असेल तर ६० हजारापर्यंत आणि त्यापेक्षा अधिक मोठा स्टेज आणि लाईटस्ची जास्त मागणी असल्यास बजेट ७० हजाराच्यावरही जाते. गेल्यावर्षी वगळता त्यापूर्वी आम्हाला दहीहंडीच्या उत्सवासाठी ठाण्यातून ३-४ ठिकाणहून डेकोरेशनस्च्या आॅर्डर असतं. मात्र यंदा अजूनपर्यंत एकही आॅर्डर आलेली नाही. उलट आमच्याकडे असलेल्या कामगारांना आम्हाला बिनकामाचा पगार द्यावा लागतो आहे. -रवी पुजारी, आर.आर.डेकोरेटर्स

मी गेली सहा ते सातवर्षे रवींद्र फाटक आयोजित दहीहंडीचे नियोजन करीत आहे. मी स्वत: एका दहीहंडी पथकाचा भाग आहे. परंतु, बुधवारी आलेल्या निर्णयामुळे आता काही घडू शकत नाही असे वाटत आहे. ज्यांनी याचिका टाकली आहे. त्यांच्या घरासमोर स्टूलवर उभे राहून मी हंडी मात्र नक्की फोडणार आहे. दहीहंडीत थरावर चढणारे मोठ्या हुद्द्यावर काम करणारेदेखील सहभागी होतात. असेच सण का दिसतात? मला सूत्रसंचालनाची हौस आहे म्हणून हे काम करतो. सुपारी म्हणून याकडे बघत नाही.- सुशांत शेलार

Web Title: Eating curry candy is already there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.