सोशल मीडिया आणि संशयाच्या भुतामुळे सुखी संसाराला ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 11:45 PM2020-12-16T23:45:58+5:302020-12-16T23:46:09+5:30

ठाणे पोलीस आयुक्तालयातील भरोसा सेलमध्ये १,०४३ तक्रारी

Eclipse of a happy world due to social media and the ghost of doubt | सोशल मीडिया आणि संशयाच्या भुतामुळे सुखी संसाराला ग्रहण

सोशल मीडिया आणि संशयाच्या भुतामुळे सुखी संसाराला ग्रहण

Next

- जितेंद्र कालेकर

ठाणे :  सोशल मीडियावर पती-पत्नीचे असलेले लक्ष आणि एकमेकांच्या चारित्र्यावरील संशयाच्या भुतामुळे सुखी संसाराला ग्रहण लागल्याच्या अनेक तक्रारी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या भरोसा सेलमध्ये येत आहेत. गेल्या दोन वर्षांत वेगवेगळ्या कारणांच्या एक हजार ४६१ तक्रारी या कक्षाकडे आल्या. त्यातील ५०१ तक्रारींवर या पथकाने समझोता घडवून आणला आहे.
लग्नातील मानपानावरून होणारी भांडणे, सासू, सासरे, पती, दीर, नणंद यांच्याकडून माहेरून पैसे आणण्यासाठी होणारा त्रास, पतीचे परस्त्रीबरोबरचे संबंध असल्याचा संशय, पतीचे दारूचे व्यसन, पती चारित्र्यावर संशय घेतो, यातूनच पती-पत्नींमध्ये सतत वाद होतात. या तक्रारी घेऊन महिला पोलीस ठाण्यात येतात. तर, पती व्यसनी आहे अथवा त्याचे परस्त्रीशी ‘संबंध’ आहेत. तो तिकडे खर्च करेल, या भीतीने त्याचा पगारच काही महिला काढून घेतात. अशी प्रकरणे पोलिसात गेल्यानंतर सुरुवातीला साधी अदखलपात्र तक्रार दाखल होते. नंतर आयुक्तालयातील ‘भरोसा’ सेलमध्ये सामाजिक संस्थांद्वारे अशा दाम्पत्यांमध्ये समेट घडवून आणला जातो. जिथे समेट घडवून येत नाही, अशा प्रकरणांमध्ये त्यांना पोलीस ठाण्यात कारवाईसाठी पाठविले जाते. 

नवरा-बायकोमध्ये होणाऱ्या भांडणाची कारणे
चारित्र्यावर संशय घेण्यातून अनेक दाम्पत्यांचे वाद विकोपाला जातात. अनेक घरांमध्ये सासू (पतीची आई) पती-पत्नींमध्ये हस्तक्षेप करतात, तर काही ठिकाणी मुलींची आई या दोघांच्या संसारात ढवळाढवळ करीत असल्याच्या तक्रारी आहेत. पत्नीची वेशभूषा व पतीचे व्यसन हाही कळीचा मुद्दा आहे. पत्नीकडूनही छळवणुकीचे प्रकार वाढले, अशी सुमारे ३० टक्के प्रकरणे असल्याची माहिती ‘कॉज फाउंडेशन’च्या कल्पना मोरे यांनी दिली.

५०१ प्रकरणांत समेट
पती-पत्नींमधील वादाबरोबर बऱ्याच प्रकरणांमध्ये सासू-सुनेचे पटत नाही. एकत्र कुटुंबातून वेगळे व्हायचे असते. अशावेळी दोन्ही बाजूंनी समझोता घडवून आणला जातो. २०१९ मध्ये अशा १,०४३ तक्रारी आल्या. ४३६ प्रकरणांमध्ये समझोता केला. तर २०२० नोव्हेंरपर्यंत ४१८ तक्रारींपैकी ६५ प्रकरणांमध्ये समझोता केल्याचे भरोसा सेलचे सुनील कांबळे म्हणाले.

सामाजिक संस्थांच्या मदतीने  पती-पत्नींचे समुपदेशन केले जाते. त्यांच्यात समझोता घडवण्याचा प्रयत्न केला जातो. जर एखाद्या महिलेचा अति छळ किंवा माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावत असेल किंवा तिच्या जीवाला धोका असेल, मारहाण होत असेल अशा वेळी पोलीस ठाण्यात कारवाईसाठी प्रकरण पाठविले जाते.       
- पूनम चव्हाण, भरोसा सेलप्रमुख, ठाणे

Web Title: Eclipse of a happy world due to social media and the ghost of doubt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.