पर्यावरणपुरक बसेसमधून आरामदाई प्रवासाची ठाणेकरांना हुलकावणी, ठेकेदारानेच गुंडाळला इथेनॉईल बसेसचा गाशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 03:04 PM2018-08-06T15:04:58+5:302018-08-06T15:08:17+5:30

ठाणेकरांना पर्यावरण पुरक आरामदाई प्रवास देण्याच्या ठाणे परिवहन सेवेच्या इथेनॉईल बसेसला अखेर ब्रेक लागला आहे. ज्या ठेकेदाराकडून या बसेसेची अपेक्षा धरण्यात आली होती. त्यानेच आता गाशा गुंडाळल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.

Eco-friendly buses stop the Thane buses, contractor breaks down the ethanol buses | पर्यावरणपुरक बसेसमधून आरामदाई प्रवासाची ठाणेकरांना हुलकावणी, ठेकेदारानेच गुंडाळला इथेनॉईल बसेसचा गाशा

पर्यावरणपुरक बसेसमधून आरामदाई प्रवासाची ठाणेकरांना हुलकावणी, ठेकेदारानेच गुंडाळला इथेनॉईल बसेसचा गाशा

googlenewsNext
ठळक मुद्दे१०० बसेस होणार होत्या दाखलपालिका शोधणार नवा पर्याय

ठाणे - ठाणे महापालिकेने आता इलेक्ट्रीक बसपाठोपाठ इथेनॉईलवर चालणाऱ्या बसेस घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आपल्या मर्जीतील ठेकेदारालाच १०० इथेनॉईलवर चालणाºया बसेसचे कंत्राट देण्याचा घाट पालिकेतील काही मंडळीकडून सुरु होता. या संदर्भात लोकमतमध्ये वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर अखेर या ठेकेदारानेच या बसेसचा गाशा गुंडाळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता ठाणेकरांना या बसेसच्या बदल्यात दुसरा पर्याय काय द्यायचा याचा विचार आता सुरु झाला आहे.
                   ठाणे महापालिकेच्या परिवहनच्या सेवेत जेएनएनयुआरएम अंतर्गत टप्याटप्याने २३० बसेस दाखल झाल्यात. शिवाय येत्या काळात १०० इलेक्ट्रीक बसेस दाखल होणार असून त्यातील पहिली बस काही दिवसांपूर्वीच परिवहनच्या ताफ्यात दाखल झाली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून पहिल्या महिन्याचा पालिकेचा हिस्सासुध्दा संबधींत ठेकेदाराने पालिकेला दिला आहे. पुढील वर्षी जुलैपर्यंत टप्याटप्याने उर्वरीत ९९ बसेस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या बसेससोबतच पालिकेने १०० इथेनॉईलवर धावणाºया बसेस घेण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला होता. या बसेस पर्यावरणाला साजेशा असून त्यामुळे प्रदुषण कमी होणार आहे. शिवाय इंधनाची बचत होणार आहे. प्रवाशांना देखील या बसेसमधून आरामधाई प्रवासाची हमी पालिकेने दिली होती. त्यानुसार पीपीपी तत्वावर या बसेस घेतल्या जाणार होत्या. पालिकेला या बसेसच्या उत्पन्नातून काहीही नफा मिळणार नाही. त्यामुळे पालिका या बसेसवर जाहीराती करुन त्या पोटी मिळणारे उत्पन्न आपल्या तिजोरीत टाकणार होते. त्यानुसार मागील दिवाळीपर्यंत ५० बसेस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार होत्या. या बसेसचा रुटही घोडबंदर ते ठाणे आणि मुलुंड या मार्गावर धावणार होत्या.
                     परंतु आता ज्या ठेकेदाराकडून या बसेस येणार होत्या. त्या ठेकेदारानेच आता यातून काढता पाय घेत गाशा गुंडाळल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. अचानक ठेकेदाराने माघार का घेतली याचे उत्तर मात्र पालिका प्रशासनाकडून देण्यात आलेले नाही. परंतु या बसेसचे कंत्राट ठराविक किंवा आपल्या मर्जीतील ठेकेदाराला मिळावे म्हणून पालिकेतील काही अधिकाºयांनी फिल्डींग लावली होती. त्यानुसार निविदा काढण्यात आल्या होत्या. परंतु ज्या मर्जीतील ठेकेदाराला हे काम देण्याचा घाट घातला जात होता. त्याच्या विरोधात लोकमतमध्ये वृत्त प्रसिध्द झाल्याने त्याने यातून माघार घेतली होती. त्यामुळे पालिकेने पुन्हा फेरनिविदाही काढल्या होत्या. ज्या निविदाकाराने कंत्राट भरलेच नव्हते. त्यालाच हे काम देण्याचा घाटही घातला जात होता. त्यानंतर पुन्हा त्याच ठेकेदारासाठी नव्याने फिल्डींग लावली गेली होती.
परंतु आता सर्व सोपास्कार झाल्यानंतर आता ठेकेदारानेच या बसेसबाबत अनास्था दाखविली असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. शिवाय सुरवातीला जी काही रक्कम भरावी लागते, ती रक्कम सुध्दा अद्याप संबधींत ठेकेदाराने भरलेली नाही. त्यामुळे जवळ जवळ पर्यावरण पुरक बसेस पाहण्याचे स्वप्न मात्र आता भंगल्यात जमा आहे.




 

Web Title: Eco-friendly buses stop the Thane buses, contractor breaks down the ethanol buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.