भक्तीची इको फ्रेंडली शक्ती!
By admin | Published: December 7, 2015 01:02 AM2015-12-07T01:02:13+5:302015-12-07T01:02:13+5:30
भक्तीमध्ये मोठी शक्ती असते. भक्तीला कृतीची जोड मिळाली तर ती निसर्गाचा समतोल साधण्यास उपयुक्त ठरू शकते.
मुरलीधर भवार , कल्याण
भक्तीमध्ये मोठी शक्ती असते. भक्तीला कृतीची जोड मिळाली तर ती निसर्गाचा समतोल साधण्यास
उपयुक्त ठरू शकते. स्वाध्याय परिवाराच्या स्वाध्यायींनी ‘कृती भक्ती’चा अलौकिक प्रयोग करून कल्याण ग्रामीण परिसरातील २० गावांमध्ये ५०० शोषखड्डे तयार केले आहेत.
या प्रयोगामुळे गावात सांडपाण्याच्या निचऱ्याची समस्या बहुतांशी मार्गी लागली असून, डांसांचे प्रमाण कमी होऊन सांडपाणी जमिनीत मुरते. शिवाय सिमेंट काँक्रीटीकरणाचे जंगल वाढत असताना पाणी जमिनीत मुरून भूजलस्तर वाढीस मदत होत आहे. भक्तीचा हा इको फ्रेंडली
प्रयोग सगळ््याच गावात राबविला गेला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रस्ते विकसित करण्याचे तंत्र विकसित झाल्यावर देशात डांबरी रस्ते तयार करणाऱ्यांची लॉबी तयार झाली होती. त्यानंतर कायम स्वरुपी सिमेंट काँक्रीटीकरणाचे रस्ते तयार करण्याची टूम सुरू झाली. शहरांसह खेडोपाडी सिमेंट काँक्रीटीकरणाचे रस्ते तयार होऊ लागले. सिमेंटचे पेव्हर ब्लॉकही आले. त्याचा निसर्गाला फटका बसला.